शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जातीच्या दाखल्यासाठी पुराव्यांची सक्ती नको, वडार समाज संघटनेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By संतोष भिसे | Updated: July 24, 2023 17:08 IST

समाजाच्या प्रगतीत अडथळे

सांगली : महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेतर्फे सोमवारी (दि. २४) सांगलीतजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष विनायक कलकुटगी यांनी नेतृत्व केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.विश्रामबाग चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. पिवळे ध्वज घेतलेले महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भर पावसात मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. महिला आंदोलक अग्रभागी अखंड घोषणाबाजी करत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा रोखला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.आदोलकांच्या मागण्या अशा : जातीचा दाखला व जात पडताळणीसाठी आवश्यक १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करावी, पॅरामेडिकल व्यवसाय व व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी समाजातील विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत मिळावी, दगडफोडीचे काम करणाऱ्या ५० वर्षे वयावरील महिलांना बांधकाम कामगार महामंडळाकडून दरमहा निवृत्तीवेतन मिळावे.आंदोलकांचे नेते विनायक कलकुटगी म्हणाले, कष्टकरी असलेल्या वडार समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. समाजाचा पारंपारीक व्यवसाय बांधकाम मजुरी आहे. समाजबांधवांच्या उदरनिर्वाहाचे हेच मुख्य साधन आहे. कामाच्या गरजेपोटी सतत भटकंती करत असतो. एका ठिकाणी जास्त दिवस राहत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे रहिवासी पुरावा मिळत नाही. पण जातपडताळणीसाठी पूर्वीचा पुरावा मागितल्याने अडचणी येतात.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद पोवार, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल सांवत, आशुतोष कलकुटगी, सुरेश कलकुटगी, श्रीराम अलाकुंटे, उमेश वडर, संदीप अलाकुंटे, दीपक वडर, राकेश कलकुटगी, राजू कलकुटगी, संदीप पवार, गणेश सांळुखे, संतोष वडर, चंद्रकांत सरगर आदींनी नेतृत्व केले. समाजाच्या प्रगतीत अडथळेकलकुटगी म्हणाले, पुराव्याच्या अटीमुळे समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. विद्यार्थी, नोकरदारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुराव्याची अट रद्द केली पाहिजे.

टॅग्स :SangliसांगलीCaste certificateजात प्रमाणपत्रcollectorजिल्हाधिकारी