जत : रेवनाळ (ता. जत) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच धनाजी पाटील यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला आहे. याबद्दल जत तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आल.
रेवनाळ ग्रामपंचायत निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. धनाजी पाटील लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. चार सदस्य त्यांच्या गटाचे होते. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी सरपंच गटातील सदस्य फोडून त्यांच्याविरोधात डिसेंबर २०२० मध्ये अविश्वास ठराव दाखल केला होता. प्रशासनाने तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. यासंदर्भात गावातील नागरिकांचे मतदान घेऊन निर्णय घ्यावा, असा आदेश त्यांनी दिला होता. १ जानेवारी रोजी गावात मतदान झाले. त्यामध्ये विद्यमान सरपंच धनाजी पाटील १६ मतांनी परत निवडून आले. त्यामुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
गावातील आजी-माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य व विद्यमान ग्रामपंचायत नऊ सदस्यांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव दाखल केला होता.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. युवराज निकम, गणेश गिड्डे, संतोष भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते.
चाैकट
कार्यकर्त्यांची ताकद
राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ताकद लावून विद्यमान सरपंच पाटील यांना पुन्हा पदावर बसवले आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
फोटो-०४जत१