कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक हे येत्या काही दिवसांत पादचाºयांसाठी बंद केले जाणार आहे. या ठिकाणी घडणाºया रेल्वे अपघातांमुळे विनाकारण कर्मचाºयांवर ताण येत आहे. त्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी दिली. बुधवारी सकाळी त्यांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह परिसराची पाहणी केली. तसेच येथील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
राजर्षी शाहू महाराज रेल्वेस्थानकाला भेट व सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी देऊसकर कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णात पाटील, वरिष्ठ परिचालन प्रबंधक गौरव झा हे उपस्थित होते.
पाहणीदरम्यान देऊसकर म्हणाले, ‘मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी दरम्यान रेल्वे रुळांवरील पादचारी पूल उभारणीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेस रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. हा पूल महानगरपालिकेच्या वतीने बांधायचा आहे. रेल्वेची फक्त निरीक्षक म्हणून भूमिका राहणार आहे. वारंवारच्या दुर्घटना पाहता रूळ पादचाºयांसाठी बंद करण्यात येणार आहे.’
सकाळी देऊसकर यांनी रेल्वेस्थानक, रेल्वे रुळांसह कर्मचारी निवासस्थानांची पाहणी केली. यावेळी कर्मचाºयांनी समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. महिन्याच्या आत निवासस्थानकातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. रेल्वेस्थानक परिसरातील अस्वच्छतेबाबत त्यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी कोल्हापूर स्थानकातील विभागातील अधिकारी उपस्थित होते.मिरज-पंढरपूर गाडी लवकरचमिरज-पंढरपूर ही गाडी कोल्हापुरातून सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. यासह प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलेवडाप, रिक्षा गायबरेल्वेचे वरिष्ठ अधिकारी येणार म्हटल्यावर रेल्वेस्थानकावर नेहमी दिसणारे वडाप, वडापावच्या गाड्या बुधवारी दिसून आल्या नाहीत. तसेच नेहमीच अस्ताव्यस्त असणारे पार्किंग सुस्थितीत होते. नेहमीच अस्वच्छतेच्या गर्तेत असणारे रेल्वेस्थानक तपासणीसाठी वरिष्ठ अधिकारी बुधवारी येणार म्हणून चकाचक करण्यात आले होते. एखादा अधिकारी येणार म्हटल्यावर स्थानक साफसफाई, तसेच डागडुजीच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष कसे दिले जाते, याची प्रचिती प्रवाशांना यावेळी आली.कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानक येथील मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी दरम्यान असलेल्या रेल्वे रूळ व परिसराची पाहणी बुधवारी कोल्हापूर दौºयावर आलेले विभागीय रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी केली. यावेळी प्रबंधक कृष्णात पाटील, वरिष्ठ परिचालन प्रबंधक गौरव झा यांची प्रमुख उपस्थिती होती.