शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

औषधांसाठी पैसे नाहीत, पण जी-२० परिषदेवर साडे चार हजार कोटी खर्च केले; जयंत पाटील यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

By अविनाश कोळी | Updated: October 7, 2023 19:43 IST

व्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा घातक

इस्लामपूर : राज्यात औषधांच्या तुटवड्याने रुग्णांचा मृत्यू झाला. सरकारकडे अंगणवाडी शिक्षिकांचे पगार करायला पैसे नाहीत. अपंग, वृध्द, विधवा महिला, निराधार व्यक्तींना वेळेवर पेन्शनचे पैसे मिळत नाहीत. मात्र नरेंद्र मोदींनी जी २० परिषदेवर ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. साखराळे (ता.वाळवा) येथे ''एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी'' या उपक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, आनंदराव पाटील, सरपंच सुजाता डांगे, उपसरपंच बाबुराव पाटील, शिवाजी डांगे, भास्करराव पाटील, अलका माने, रामराजे पाटील, शैलेंद्र सुर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले की, आमचे मित्र चंद्रशेखर बावनकुळे इस्लामपूरमध्ये माईक घेऊन घरोघरी फिरले. मोदींची लोकप्रियता कमी होत असल्याने असे उपक्रम त्यांना राबवावे लागत आहेत. सरकारे येतात आणि जातात, मात्र सध्या आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्यावर जी गदा आणली जात आहे,ती देशासाठी घातक आहे. देशात महागाईने कळस गाठला असून सामान्य माणूस या महागाईने होरपळला जात आहे. सध्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात सामान्य माणसांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे.नांदेडच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागणे, हे दुर्दैवी आहे. आमच्या काळात आम्ही औषध खरेदीचे अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या सरकारने ते अधिकार आपल्याकडे घेतले होते. आता आम्ही बोलू लागल्यावर अधिकाऱ्यांना औषध खरेदीचे अधिकार दिल्याचा नवा आदेश काढला आहे. सध्या निवडणूका जवळ येतील,तशा विविध सवलती जाहीर केल्या जात आहेत. मात्र जनता आता फसणार नाही.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलG20 Summitजी-२० शिखर परिषदNarendra Modiनरेंद्र मोदी