शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाच्या कारवाईतून कोणीही सुटणार नाही : केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:43 PM

अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअनिकेतच्या कुटुंबास दोन दिवसात मदतपोलिस यंत्रणेतील दोष सुधारले पाहिजेत...तर नीतेश राणेंची चौकशी

सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जातील, पोलिस यंत्रणेतील दोष सुधारले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनिकेतच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या कुटुंबास मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. ते स्वत: दोन दिवसात मदतीची घोषणा करतील. प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या सात पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

सांगलीत घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी राज्यस्तरावरील पोलिस अधिकाºयांशी चर्चा करुन उपाययोजना केल्या जातील. आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला की, हा तपास सीआयडीकडेच जातो. सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे.

केसरकर म्हणाले, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यानिमित्ताने सांगली पोलिस दलाच्या यंत्रणेत दोष असल्याचे दिसून येते. हे दोष सुधारले पाहिजेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करुन पोलिस प्रशासनातील त्रुटी दूर केल्या जातील. अटक केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासनातर्फे न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जाईल.

सांगलीकरांनीही तपासात सहकार्य करावे. शहरात शांतता नांदावी, यासाठी सहकार्य करावे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या खटल्यात नियुक्ती करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. या प्रकरणानंतर सांगलीकरांनी दाखविलेल्या शांततेबद्दल मी आभार मानतो. सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी पुकारलेला सांगली बंद मागे घ्यावा, अशी माझी विनंती आहे.

केसरकर पुढे म्हणाले, पुढील काही दिवसात हा तपास वेगाने झालेला दिसेल. मुंबईत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत तपासाचा आढावा घेतला जाईल. झाकीर पट्टेवाले या झिरो पोलिसालाही अटक केल्याचे समजले. पोलिस दलात झिरो पोलिस लागतातच कशासाठी? यापुढे झिरो पोलिस दिसल्यास खपवून घेतले जाणार नाही.

अनिकेत परत येणार नाही...केसरकर म्हणाले, अनिकेतचे कुटुंब दु:खात आहे. आर्थिक मदत देऊन या कुटुंबाचे दु:ख दूर होणार नाही. आज या कुटुंबाने कर्ता माणूस गमावला आहे. तो परत येणार नाही. यातील आरोपींना शिक्षा झाली तरच या कुटुंबाला समाधान वाटेल. यासाठी शासनाचे प्रयत्न असतील.

कारवाई झालेली दिसेलकेसरकर म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरणात ज्या काही तक्रारी व संशय व्यक्त करण्यात आला आहे, त्याची चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळलेला लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही. निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेला कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याच्यावरही कडक कारवाई केली जाईल.

...तर नीतेश राणेंची चौकशीखून करुन गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोप नीतेश राणे यांनी केला आहे. या प्रश्नावर केसरकर म्हणाले, नीतेश राणे हे वयाने आणि अनुभवाने लहान आहेत. त्यांची बौद्धिक पातळी काय, हे बघावे लागेल. अनिकेत प्रकरणात वक्तव्य करणाºया राणे यांच्याकडे जर काही माहिती असेल, तर त्यांचीही चौकशी करावी लागेल.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Sangliसांगली