देवराष्ट : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात वाघ सोडण्याचा अद्याप प्रस्तावच नसल्याची माहिती सागरेश्वरचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी दिली. मात्र अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याचा दावा दिल्ली येथील एनटीआरसी या संस्थेच्या सदस्यांनी केला असून, या प्रकल्पासाठी कोट्यवधीचा निधी लागणार आहे. येत्या काही महिन्यांत प्रस्ताव दाखल झाल्यास प्रत्यक्ष अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.
सागरेश्वर व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विचाराधीन आहे. मात्र अजून प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. नॅशनल टायगर रिझर्व्ह कॉर्पोरेशनचे डॉ. विजयकुमार यांनी सागरेश्वर अभयारण्यास भेट देऊन व प्रत्यक्ष अभयारण्याच्या भौगोलिक परिस्थितीची पाहणी करून, येथील वातावरण वाघांसाठी पोषक असल्याचा दावा केला आहे. तसेच येथे वाघांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.
त्यानुसार वरिष्ठ पातळीवर अभयारण्यात वाघ सोडण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत लवकरच अधिकाऱ्यांचे एक पथक ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन तेथील भौगोलिक व नैसर्गिक वातावरणाचा अभ्यास करणार आहे. त्यानंतरच या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.याबाबत वनक्षेत्रपाल साळी म्हणाले की, सागरेश्वर अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी वातावरण व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असली तरी, अभयारण्याला कुंपण घालणे गरजेचे आहे. सध्या ७ फूट उंचीचे कुंपण असून ते किमान १५ फूट उंचीचे करणे गरजेचे आहे. अजूनही अभयारण्याच्या काही भागामध्ये जागेच्या हद्दीवरून वाद असल्याने कुंपण घालण्याचे काम थांबलेले आहे. शिवाय कुंपणाशेजारील काही अंतरावरील झाडेही काढावी लागणार आहेत. कर्मचाºयांना प्रशिक्षणासह पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. यासाठी कोट्यवधीच्या निधीची गरज आहे. प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.प्रकल्पासाठी ३५ कोटींची गरजसागरेश्वर अभयारण्यात वाघ दाखल होण्यासाठी अभयारण्याला कुंपण घालणे, वाहनांची खरेदी करणे, कर्मचाºयांना प्रशिक्षण या व अन्य बाबींसाठी अंदाजे ३५ कोटी रुपयांची गरज आहे.किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागणारसागरेश्वर अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून प्राथमिक बाबींची पूर्तता करण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे.