शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नको बिबट्याची अफवा; हवी फक्त सतर्कता!

By admin | Published: July 22, 2016 11:25 PM

खंडाळा तालुक्यात वन्यप्राणी : ‘लोकमत’ कार्यालयात प्राणीमित्रांनी व्यक्त केली मते --लोकमत परिचर्चा

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसलेल्या पाटण तालुक्यातील धानकल येथे दहा फुटी अजगर सापडले तर कण्हेर धरणाजवळ सापडलेल्या सात फुटी मगरीवर बसून फोटोसेशन केले गेले. तर नुकतेच खंडाळा येथील अंदोरी येथे दोन बिबट्यांचे नागरिकांना दर्शनही झाले. वन्यप्राणी लोकवस्तीत येत असल्याच्या एका पाठोपाठ तीन घटना घडल्याने काही ठिकाणी नागरिकांचा उत्साह तर काही ठिकाणी घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अशा प्रकारचे प्राणी दिसल्यानंतर नागरिकांनी काय भूमिका घेतली पाहिजे, हे नागरिकांना माहिती व्हावे, यासाठी ‘लोकमत’ कार्यालयामध्ये वनविभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील वन्यप्रेमींचा परिचर्चा आयोजित करण्यात आला. बिबट्या विनाकरण कोणावर हल्ला करत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. बिबट्या एका ठिकाणी राहत नाही तो सतत जागा बदलत असतो. त्यामुळे नागरिकांनी अफवा पसरवू नये, असे आवाहन करून वनखात्याने पुढाकार घेऊन जनजागृजी करावी, असे मतही या चर्चामध्ये वन्यप्रेमींनी मांडले.खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथे नागरिकांना बिबट्या दिसल्यानंतर अनेक मत-मतांतरे समोर आली. हा बिबट्या अंदोरी येथे कसा आला असेल? यावर खंडाळ्याचे वन्यप्रेमी रवींद्र पवार म्हणाले, ‘अंदोरी हे गाव पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. शेजारीच नदी आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात बिबट्या या ठिकाणी आला असावा. आजपर्यंत या भागात कोणालाही हिंस्त्रप्राणी दिसले नव्हते. त्यामुळे या भागातील लोक आणखीनच घाबरत आहेत.’वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड रिसर्च सोसायटीचे अध्यक्ष अमित सय्यद म्हणाले, ‘जंगलात बिबट्यांचे खाद्य कमी झाले आहे. अन्नाच्या शोधात बिबट्या नागरीवस्तीत आला असावा. आपण लोक त्यांच्या जंगलात चाललो आहोत, हे थांबले पाहिजे. अनेकदा लोक अफवा पसरवतात. त्यामुळे विनाकारण वनविभागालाही वेठीस धरले जाते. अंदोरीजवळ दिसलेला बिबट्या मादी असावी, दोन वर्षांच्या बछड्याला मादी सोडून देते. ही मादी आपल्या बछड्याला सोडायला आली असावी,’ अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. वन्यजीव प्राणी सगळीकडेच दिसतात. त्यामुळे नागरिकांनी असे प्राणी दिसल्यास फार गाजावाजा करू नये, त्यांच्यापासून काही अंतरावर थांबल्यास हे प्राणी कोणालाही इजा न करता निघून जातात, असेही मत वन्यप्रेमींनी व्यक्त केले. (लोकमत चमू)अन्नाच्या शोधात मानवी वस्तीतकोणताही प्राणी मनुष्यवस्तीत येत नाही. खायला, प्यायला अन् लपायला हा बिबट्या आला असेल. नैसर्गिकरीत्या जेथून बिबट्या आला असेल, तेथे परत जाईल.- तानाजी गायकवाड (सहायक वनसंरक्षक)बिबट्या हल्ला कधी करतो...बिबट्याला असुरक्षित वाटल्यास तो हल्ला करतो.४गुपचूपपणे त्याच्याजवळून चालत गेल्यास.४बिबट्यासमोर खाली बसल्यास तो हल्ला करतो.४बिबट्याच्या उंचीपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीवर तो हल्ला करत नाही. बिबट्या हल्ला कधी करतो...बिबट्याला असुरक्षित वाटल्यास तो हल्ला करतो.४गुपचूपपणे त्याच्याजवळून चालत गेल्यास.४बिबट्यासमोर खाली बसल्यास तो हल्ला करतो.४बिबट्याच्या उंचीपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीवर तो हल्ला करत नाही.