- संतोष भिसेलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दर्जेदार द्राक्षे उत्पादनाची नस सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता त्यातही थक्क करणारे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. वाढत्या स्पर्धेचा दरावर परिणाम होतो, त्यामुळे इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची कल्पकता शेतकरी दाखवत आहेत. यातूनच चक्क सुगंधी द्राक्षांचे वाण विकसित झाले आहे. ही द्राक्षे खाल्ल्यानंतर जिभेवर गुलकंद आणि करवंदाचा स्वाद पसरतो. ही ‘गुलकंद्राक्षे’ चर्चेची आणि कुतूहलाची ठरली आहेत.
द्राक्ष उत्पादनात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेले सांगलीकर द्राक्षातून चांगले उत्पन्न घेत आहेत. हमखास उत्पादनाचे इंगित सापडल्यानंतर काही द्राक्षगुरूंनी वेलींवर कलमे करत वेगवेगळ्या जातींची पैदास सुरू केली. त्यातूनच खास सांगलीच्या अशा काही जाती देशभरात नावारूपाला आल्या. हटके काहीतरी करण्याच्या महत्त्वाकांक्षेतूनच मणेराजुरी (ता. तासगाव) येथे सुगंधी द्राक्षांची बाग फुलवली.सुरुवातीला यासाठीच्या द्राक्षकाड्या केरळमधून आणल्या. उर्वरित सर्व लागवड, खत-पाणी, औषधे मात्र स्थानिकच आहेत.
बिया औषधी गुणधर्माच्याnपुणे जिल्ह्यात सुगंधी द्राक्षांचा प्रयोग झाला होता; पण ती चेरीच्या आकाराची होती. सांगलीतील द्राक्षे मात्र मोठ्या आकाराची व रसाळ आहेत. nद्राक्षप्रेमींची पसंती बिनबियांच्या द्राक्षांना असली तरी, सुगंधी द्राक्षे मात्र बियांची आहेत. या बिया औषधी गुणधर्माच्या असल्याचा दावा केला जातो. nद्राक्षांना चारपट जास्त दरही मिळाला. पाहता-पाहता विकली गेली. जानेवारीमध्ये बाग संपली.!nव्यावसायिक स्पर्धा टाळण्यासाठी या शेतकऱ्याने वाणाचा फारसा गाजावाजा केला नाही; पण स्वत:च्या नावाने उत्पादन बाजारात आणले. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्याने माहिती दिली.
खाताक्षणी जिभेवर संमिश्र स्वादही द्राक्षे काळ्या रंगाची आहेत. शेतकऱ्याने स्वत:च्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवरून त्याचे नामकरण केले आहे. ती खाताक्षणी जिभेवर संमिश्र स्वाद पसरतो. काही क्षणांतच लक्षात येते, अरे हा तर गुलकंद! अर्थात, त्यामध्ये काहीसा डोंगरी करवंदांचा स्वादही मिसळला आहे.