शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

बोगस माहितीबद्दल २२१ शिक्षकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:11 PM

सांगली : शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या जिल्ह्यांतर्गत बदली व आंतरजिल्हा बदलीसाठी बोगस माहिती दिल्याने आणि कागदपत्रांतील त्रुटीप्रकरणी २२१ शिक्षकांना नोटिसा बजावण्याची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी केली. शिक्षकांच्या बदल्यांतील हरकतींवर गुरुवारी सुनावणी होईल. सुनावणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत कारवाईबाबत कोणता निर्णय देणार, याबाबत शिक्षकांना उत्सुकता आहे.जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ...

सांगली : शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या जिल्ह्यांतर्गत बदली व आंतरजिल्हा बदलीसाठी बोगस माहिती दिल्याने आणि कागदपत्रांतील त्रुटीप्रकरणी २२१ शिक्षकांना नोटिसा बजावण्याची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी केली. शिक्षकांच्या बदल्यांतील हरकतींवर गुरुवारी सुनावणी होईल. सुनावणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत कारवाईबाबत कोणता निर्णय देणार, याबाबत शिक्षकांना उत्सुकता आहे.जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीमुळे अनेकांची अडचण झाली आहे. या बदल्या करताना पती-पत्नी यांच्या बदल्या, समानीकरणाच्या जागा रिक्त न ठेवणे यासह अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे काही शिक्षकांची गैरसोय झाली आहे, शासन आदेशाप्रमाणे या बदल्या झालेल्या नाहीत, अशाही तक्रारी करण्यात आल्या होत्या. या बदल्यांबाबत अनेकांनी हरकती घेतल्या आहेत. शिक्षकांना सोयीची बदली होण्यासाठी बोगस माहिती देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय बहुतांशी शिक्षकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. चुकीची माहिती देण्यासह कागदपत्रांतील त्रुटींसाठी संबंधित शिक्षकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहे.काही शिक्षकांनी स्वत:च्या आजाराचे खोटे प्रमाणपत्र, आई-वडील यांचा आजार, अपंग मूल, भावाचा सांभाळ करत आहोत, त्यामुळे आम्हाला दूरच्या शाळेवर नियुक्ती न देण्याची विनंती करणारी माहिती अर्जात भरलेली आहे. बदली प्रक्रियेत संवर्ग १ मध्ये गतिमंद, मंतिमंद, विकलांग मुलांचे पालकत्व स्वीकारणाऱ्यांना सवलत मिळते. या सवलतीचा जिल्ह्यातील काही शिक्षकांनी लाभ घेतला असून, यामध्येही काही त्रुटी आहेत. काहींनी पती-पत्नी एकत्रिकरणाखाली अर्ज केला असून तेही प्रमाणपत्र बोगस आढळून आले आहे. या शिक्षकांना कारवाईच्या नोटिसा जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांत खळबळ उडाली आहे.विस्थापित आक्रमक : कारवाईचा आग्रहशिक्षकांनी बोगस माहिती भरल्यामुळे अनेक शिक्षकांना ‘खो’ बसल्याने त्यांना विस्थापित व्हावे लागले होते. यामध्ये काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनाही विस्थापित व्हावे लागल्यामुळे, त्यांनी बोगस माहिती देणाºया शिक्षकांवर कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. विस्थापित शिक्षकांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. म्हणूनच जिल्हा परिषद प्रशासनाने बोगस माहिती देणाºया शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, विस्थापित शिक्षकांनी बोगस माहिती दिलेल्या शिक्षकांना मूळ ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी पूर्ववत आमची नियुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.हरकती दाखल केलेल्या शिक्षकांचीही सुनावणीजिल्ह्यातील शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे हरकती दाखल केल्या होत्या. या सर्व हरकती शिक्षणाधिकाºयांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दाखल केल्या. त्यावर २५ ते २७ जुलै या तीन दिवसांच्या कालावधित पुण्यात सुनावणी झाली. त्यावेळी विभागीय आयुक्तांनी शिक्षकांना फटकारले होते. शिक्षकांनी विभागीय आयुक्तांसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. बदल्यांसंदर्भातील शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी गुरुवार, दि. ३० रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्याकडे सुनावणी होणार आहे.