सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढत असतानाच विद्यार्थ्यांच्या अधिक विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाºया परीक्षेबाबत अनेक शाळांचे दुर्लक्ष झाले आहे. परीक्षेबाबत या शाळांना प्राथमिक शिक्षण विभागाकडून नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. दरम्यान, जादा तासिकांच्या केलेल्या नियोजनाबाबत गटशिक्षणाधिकाºयांकडून माहिती मागविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी सांगितले.
राज्य शासनाकडून पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. मात्र, या परीक्षांची अगोदरच एक वर्ष विद्यार्थ्यांची तयारी व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून पंधरा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून गुणवत्ता परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. निधीची तरतूद असतानाही शाळांनी मात्र परीक्षेची अंमलबजावणी गंभीर घेतली नसल्याचे दिसून येत आहे. जत तालुक्यातील काही शाळांना भेटी देऊन पाहणी केल्यानंतर ही बाब समोर आल्याने आता परीक्षेच्या नियोजनात ढिलाई करणाºया शाळांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. शिक्षणाधिकाºयांनी याबाबत गटशिक्षणाधिकाºयांना जबाबदारी दिली असून, जादा तासिकांचे नियोजन व परीक्षेच्या अंमलबजावणीबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.प्रशिक्षण पूर्ण, अंमलबजावणीच नाहीपाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा असल्याने व जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा चौथीपर्यंतच असल्याने विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे पुढील परीक्षेची तयारी या हेतूने गुणवत्ता परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. या योजनेस माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नाव देण्यात आले आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. काही शाळा प्रभावीपणे जादा तास घेऊन तयारी करत असताना, अनेक शाळांनी ही परीक्षा गांभीर्याने घेतली नसल्याने आता त्यांना परीक्षेचे नियोजन करावे लागणार आहे.