शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
3
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
4
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
5
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
6
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
7
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
8
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
9
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
10
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
11
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
12
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
13
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
15
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
16
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
17
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
18
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
19
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
20
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा

सांगली जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांसह ४१ जणांना नोटीस, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Published: June 14, 2024 5:08 PM

सहकार विभागाकडून नोटिसा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५०.५८ कोटींचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बँकेच्या आजी-माजी संचालक व अधिकाऱ्यांसह ४१ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. २७ जून रोजी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. चौकशी अधिकारी तथा कोल्हापूर शहर उपनिबंधक डॉ. प्रिया दळणर यांनी नोटिसा दिल्या आहेत.बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या काही निर्णयांबाबत सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित तक्रारीत तथ्य आढळल्याने तत्कालीन संचालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे चार प्रकरणांत बँकेचे ५० कोटी ५८ लाख ८७ हजारांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वसुलीसाठी कलम ८८ अंतर्गत चौकशीची शिफारस करण्यात आली. त्यानुसार कलम ८८ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. महांकाली, माणगंगा साखर कारखान्यांच्या खरेदीत १ कोटी १७ लाख, जिल्ह्यातील ७६३ विकास संस्थांच्या संगणकीकरणावर अनावश्यक खर्च १४ कोटी ६७ लाख, नॉन बँकिंग अस्सेट खरेदीत चुकीचा जमा खर्च २२ कोटी ४२ लाख, महांकाली कारखान्याची शिल्लक व खराब साखर विक्रीत ११ कोटी ५१ लाख रुपयांचे नुकसानीचा ठपका ठेवला आहे. याप्रकरणी बँकेकडून आजी-माजी संचालक, अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासा करण्याची सूचना डॉ. प्रिया दळणर यांनी नोटिसामध्ये केल्या आहेत.

सहकार विभागाकडून यांना नोटिसानोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये विद्यमान अध्यक्ष व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, नूतन खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार मोहनराव कदम, अनिल बाबर (मयत), विलासराव शिंदे (मयत), अजितराव घोरपडे, संचालक तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, बी.एस. पाटील, दिलीपतात्या पाटील, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, वैभव शिंदे, सुरेश पाटील, पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख, अनिता सगरे, बाळासाहेब होनमोरे, मन्सूर खतीब, चिमण डांगे, माजी संचालक उदयसिंह देशमुख, गणपती सगरे (मयत), प्रतापराव पाटील, झुंझारराव शिंदे, बी.के. पाटील, सी.बी. पाटील, श्रद्धा चरापले, कमल पाटील, सिकंदर जमादार, चंद्रकांत हाक्के (मयत), तज्ज्ञ संचालक मनोज शिंदे, सरदार पाटील, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल चौथे, जयवंतराव कडू, बाळासाहेब रामदुर्ग, प्रतापसिंह चव्हाण यांचा समावेश आहे.

नोटिसा मिळताच अपील करणारजिल्हा बँकेचे ५०.५८ कोटींचे नुकसानीस संचालक जबाबदार नाहीत. चौकशी बेकायदेशीर, चुकीची आहे. नोटीस मिळताच सहकार मंत्र्यांकडे अपील करणार आहे. प्रसंगी न्यायालयातही जाणार आहे. ज्या प्रकरणात बँकेचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे, त्यात संचालकांनी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. चौकशी अहवालातही तसे म्हटले आहे. या केवळ तांत्रिक व प्रशासकीय कामकाजातील त्रुटी आहेत. त्याला संचालक जबाबदार ठरत नाहीत, अशी भूमिका सर्व संचालकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक