शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

आता भाजपचे ‘मिशन महापालिका’

By admin | Published: February 26, 2017 12:46 AM

जि. प. यशाने आत्मविश्वास वाढला : ‘चाळीस प्लस’चे लक्ष्य, आयारामांवर राहणार भिस्त

शीतल पाटील ल्ल सांगली जिल्हा परिषद निवडणुकीतील यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘मिशन सांगली महापालिका’ची घोषणा केली आहे. दीड वर्षानंतर होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. सध्या तरी भाजपकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सक्षम उमेदवार असले तरी, भविष्यात काँग्रेस, राष्ट्रवादीमधील काही दिग्गज नगरसेवकांनी भाजप नेत्यांशी संपर्क वाढविला आहे. ‘४० प्लस’चे लक्ष्य गाठताना भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराजांवरच लक्ष ठेवावे लागणार आहे. सांगलीची महापालिका अवघी १९ वर्षांची आहे. महापालिका स्थापनेपासून आतापर्यंत चार सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून येणाऱ्यांची संख्या कधीच दखलपात्र ठरली नव्हती. विकास महाआघाडीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप एकत्र आली. तेव्हाही भाजपच्या चिन्हाऐवजी विमान चिन्हावर दोन्ही पक्षाने निवडणूक लढविली. गतवेळीही स्वाभिमानी विकास आघाडीत भाजप सहभागी झाली होती. पण गेल्या तीन वर्षात परिस्थिती बदलली आहे. केंद्र व राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपने जिल्ह्यात नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही मोठे यश मिळविले. सांगली व मिरज या दोन विधानसभा क्षेत्रात महापालिकेचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचे अनुक्रमे सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे हे दोन आमदार आहेत. शिवाय जिल्ह्यात खासदारही भाजपचाच आहे. २० वर्षापूर्वी खासदार संजयकाका पाटील यांचा सांगलीत चांगलाच वट होता. त्यामुळे दोन आमदार व एक खासदार यांच्या पाठबळावर पुढीलवर्षी होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘४० प्लस’ नगरसेवक निवडून पालिकेत कमळ फुलविण्याचे स्वप्न भाजपने पाहण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही महिन्यातील भाजपची वाटचाल ही निवडणुकीच्या तयारीची रंगीत तालीम होती. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत काही प्रभागात कार्यक्रम घेऊन ‘काँग्रेसमुक्त महापालिका’ची घोषणा केली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीनंतर त्याला अधिक गती येईल. महापालिका हद्दीत यापूर्वीही भाजपचे दोन आमदार होते. संभाजी पवार व सुरेश खाडे दोघेही भाजपकडून निवडून आले होते. पण त्यांच्या काळात झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नव्हते. आताही भाजपचे दोन आमदार आहेत. पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी गेल्या दोन वर्षात सांगली व कुपवाड या दोन शहरात कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. त्याशिवाय त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. सांगली व कुपवाडमध्ये भाजपमध्ये पहिल्या फळीतील म्हणजे ‘इलेक्शन मेरीट’ असलेले मोजकेच कार्यकर्ते आहेत. मिरजेत सुरेश खाडे यांनीही विकास कामांचा धडाका लावला आहे. तेथील परिस्थितीही सांगली, कुपवाडसारखीच आहे. पण निवडणुका जिंकण्याचे कसब आत्मसात केलेल्या भाजपला इलेक्शन मेरीट असलेले कार्यकर्ते भविष्यात मिळतील, अशीच सध्याची स्थिती आहे. महापालिकेत सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. एका गटाने सवतासुभा मांडला आहे. हा गट संभाजी पवार यांच्या स्वाभिमानी आघाडीशी हातमिळवणी करून कारभार हाकत आहे. काँग्रेसमधील काही महत्त्वाकांक्षी नगरसेवकांना पुन्हा पालिकेत निवडून यायचे आहे. त्यासाठी भाजप हा चांगला पर्याय ठरू शकतो. मिरजेतील एका नगरसेवकाच्या भाजप प्रवेशाची मध्यंतरी चर्चा होती. भविष्यात काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. नुकतेच विरोधी पक्षनेता निवडीवरून राष्ट्रवादीत छुपे बंड झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतही सारे काही आलबेल आहे, असे नाही. त्यामुळे या पक्षातील काही नगरसेवक भाजपच्या गळाला लागू शकतात. मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. याच्या जोडीला महापालिकेतील भ्रष्टाचार, घोटाळे, विकासशून्य कारभार आहेच.विधानसभेतील मताधिक्यावर निवडणुकीचे गणितविधानसभेच्या निवडणुकीत सुधीर गाडगीळ यांनी महापालिका हद्दीतील अनेक प्रभागात मताधिक्य घेतले होते. अगदी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वसंत कॉलनीतही गाडगीळ यांचे वर्चस्व राहिले होते. गाडगीळ यांना ज्या प्रभागात मताधिक्य मिळाले, त्या प्रभागावर सध्या भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. या प्रभागातील विकास कामांवर त्यांनी भर दिला आहे. पुढील सहा महिन्यात प्रभाग रचना निश्चित होईल. चार नगरसेवकांचा एक प्रभाग होणार आहे. प्रभाग रचनेनंतर भाजप आणखी आक्रमकपणे कामाला लागेल, असे संकेत एका पदाधिकाऱ्याने दिले.काँग्रेस-राष्ट्रवादीला : धसकाजिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपने यश मिळविले. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीतही भाजपचे कमळ फुलले. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाली आहे. आता काँग्रेसकडे केवळ सांगली महापालिका हे एकमेव सत्ताकेंद्र उरले आहे. शहरी भागातील भाजपचे वाढते प्रस्थ पाहता, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला धसका घेण्यासारखी परिस्थिती आहे. एकीकडे भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली असताना, काँग्रेस व राष्ट्रवादीत मात्र स्मशानशांतता दिसून येत आहे. ऐनवेळी निवडणूक रिंगणात उतरून बाजी मारण्याचे दिवस संपल्याची जाणीव अजूनही या दोन्ही पक्षांना झालेली नाही.