सांगली : समाजातील गैरप्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे योगदान महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांच्या कामाच्या कोणत्याच वेळा नसतात. त्यात महिला कर्मचाऱ्यांनाही बंदोबस्तांमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करावे लागते. आता मात्र, राज्य शासनाने महिला कर्मचाऱ्यांची ड्यूटी १२ तासांवरून ८ तास केल्याने या निर्णयाचे स्वागत हाेत आहे. जिल्हा पोलीस दलात या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नसली तरी लवकरच अंमल सुरू होणार असल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांनी याचे स्वागत केले आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांना नेहमीत कर्तव्यावर हजर राहावे लागत असल्याने अनेक अडचणी येतात. मात्र, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी मात्र, महिला कर्मचाऱ्यांना अडचणी येणार नाहीत अशाच कामाचे स्वरूप ठेवले आहे. तरीही १२ तासांची ड्यूटी असल्याने कुचंबणा होत होती. आता राज्य शासनानेच कामाच्या वेळा कमी केल्या आहेत.
चौकट
आईसोबत रोज खेळता येणार
कोट
आई पोलीस दलात सेवेत आहे याचा अभिमान आहेच; परंतु या कामामुळे तिचा आम्हाला वेळ कमी भेटत होता. आता आठ तासांच्या ड्यूटीमुळे तिला आम्हाला जादा वेळ देता येईल.
-श्रुती गराडे
कोट
आईला नेहमीच बंदोबस्तासह इतर कामे असल्याने ती वेळ देऊ शकत नव्हती. आता वेळ मिळणार आहे. आमचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचे मी आभार मानतो.
-संग्राम जाधव
कोट
मम्मी पाेलीस असल्याने आम्हाला वेळ देता येत नाही, तरीही त्याची तक्रार नाही. मात्र, आता वेळ मिळणार आहे. त्यामुळे खूप आनंद झाला. मम्मीसोबत आता वेळ मिळणार असल्याने खूप छान वाटत आहे.
-सिद्धी बनकर
चौकट
जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाणे २६
एकूण पोलीस २५८४
महिला पोलीस ४६३