आष्टा : आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या ३९१ झाली आहे. शनिवारअखेर २० लोकांचा मृत्यू झाला आहे.
आष्टा शहराची लोकसंख्या ३७ हजार १०५ आहे. शहरात १ जानेवारीपासून १५ मेपर्यंत ३९१ कोरोनाबाधित सापडले आहेत. यातील सध्या सक्रिय रुग्ण १८२ आहेत. यातील गृहविलगीकरणात १३९, रुग्णालयात ४३ रुग्ण असून, १८९ लोकांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. २० लोकांचा मृत्यू झाला आहे.
आष्टा शहरात एकूण १० प्रभाग आहेत. त्यातील प्रभाग क्रमांक १० मध्ये ९३ रुग्ण सापडले आहेत.
शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे शहरातील स्पंदन हॉस्पिटल, क्रिटिकेअर हॉस्पिटल, अण्णासाहेब डांगे धन्वंतरी रुग्णालय यासह ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. पालिकेच्या वतीने काशीलिंग बिरोबा मंदिरामागील भक्तनिवासात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.