कामेरीत गेल्या आठवड्याभरात रुग्णसंख्या कमी झाली आहे. १ ऑगस्टपासून केवळ दहा कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर ३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात ५१ अँटिजन व १७ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यात कामेरी व येडेनिपाणी येथील प्रत्येकी दाेन जणांचा समावेश आहे. १ फेब्रुवारी २१पासून दुसऱ्या लाटेत कामेरीत रुग्णसंख्या ७२९ झाली आहे. पहिल्या लाटेत गतवर्षी २७१ जण बाधीत झाले होते. त्यामुळे १० ऑगस्टअखेर एकूण रुग्ण संख्या एक हजार झाली आहे. कामेरीतील मृत्युदर २.३ टक्के आहे. चाचणी करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे गावात रुग्णसंख्या जास्त आहे, मात्र वेळेत उपचार सुरू केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१ टक्के आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, सर्व कर्मचारी, कोरोना दक्षता समितीचे सर्व सदस्य, सरपंच स्वप्नाली जाधव, उपसरपंच योगेश पाटील, ग्रामविस्तार अधिकारी आनंदराव पवार, सर्व अंगणवाडी व आशासेविका रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कामेरीत कोरोनाबाधितांची संख्या हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:31 AM