सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवत असतानाच, रविवारी मात्र दिलासा मिळाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या रविवारी नोंदवली गेली. त्यात १३४१ नवे रुग्ण आढळून येतानाच १३५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर मृतांच्या संख्येतील वाढ अद्यापही कायम असून, परजिल्ह्यातील १२ जणांसह जिल्ह्यातील ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने दिलासा असला तरी मृत्यूंची संख्या कायम आहे. रविवारी सांगली, मिरज प्रत्येकी ४, कुपवाड १, खानापूर तालुक्यात ९, जत , मिरज तालुका प्रत्येकी ७, कडेगाव, तासगाव प्रत्येकी ४, वाळवा ३, आटपाडी, शिराळा आणि पलूस तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
रविवारी जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत २००२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ६१२ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲंटिजनच्या २९७४ जणांच्या नमुने तपासणीतून ७८३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६ हजार ९६८ झाली आहे. त्यातील २६१४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३७७ जण ऑक्सिजनवर, तर २३७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील १२ जणांचा मृत्यू झाला असून, ५४ नवे रुग्ण जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ९०,७५४
उपचार घेत असलेले १६,९६८
कोरोनामुक्त झालेले ७१,१३८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २६४८
रविवारी दिवसभरात
सांगली १३९
मिरज ६२
जत १९५
मिरज तालुका १८४
वाळवा १५२
आटपाडी १२५
खानापूर १२३
तासगाव ११९
कवठेमहांकाळ ८०
कडेगाव ७२
पलूस ५२
शिराळा ३८
चौकट
बाधितांची संख्या ९० हजारांवर
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने रविवारी ९० हजारांचा टप्पा पूर्ण केला. या आठवड्यातच वेगाने रुग्णसंख्या वाढली आहे. सध्या ९० हजार ७५४ बाधित असून, त्यातील ७१,१३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.