शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

‘एक’च नंबर तब्बल साडेआठ लाखांचा!

By admin | Published: May 26, 2017 11:05 PM

‘एक’च नंबर तब्बल साडेआठ लाखांचा!

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : हौस लाख मोलाची असते, असं म्हणतात; पण सध्या हौसेखातर ‘एक’च नंबर तब्बल साडेआठ लाखांचा ठरलाय. कऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनाला ‘१’ क्रमांक मिळवण्यासाठी सहा वाहनधारकांनी पैसे भरलेत. त्यातून फक्त एका क्रमांकासाठीच परिवहनला तब्बल साडेआठ लाख रूपये मिळालेत. तसेच अन्य ‘व्हीआयपी’ क्रमांकासाठीही शेकडो वाहनधारकांनी आगाऊ रक्कम भरली असून दोन वर्षात हा आकडा दोन कोटीपर्यंत पोहोचला आहे.कऱ्हाडला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्यापूर्वी कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील वाहनधारकांना नोंदणीसाठी सातारला जावे लागत होते. त्यावेळी ‘व्हीआयपी’ क्रमांकाची म्हणावी तेवढी ‘क्रेझ’ नव्हती. त्यामुळे क्रमांकांना ‘किंमत’ही नव्हती. बहुतांश वाहनधारक मिळेल तो क्रमांक वाहनांवर टाकायचे; पण गेल्या चार ते पाच वर्षांत आकर्षक क्रमांकाची ‘क्रेझ’ भलतीच वाढली आहे. प्रत्येक वाहनधारक त्याला हवा तो क्रमांक मिळविण्यासाठी धडपड करताना दिसतो. सुरुवातीला आकर्षक क्रमांकासाठी परिवहनकडून आकारली जाणारी किंमत हजारात होती. क्रमांकांची मागणी वाढली तशी ‘परिवहन’ने महसुलातही वाढ केली. गत काही वर्षांत एका क्रमांकासाठीचा आकडा चक्क लाखाच्या घरात पोहोचला आहे. असे असतानाही अनेक वाहनधारक पैसे भरून आकर्षक क्रमांक घेत आहेत. काहीजण आकड्यांची मोडतोड करून अपेक्षित अक्षर तयार करता यावं, यासाठी क्रमांक मिळवतात. तर काहीजण स्टेटस्साठी आकर्षक क्रमांक मिळवत आहेत. काहीजण घरातील सर्व वाहनांचा क्रमांक एकच असावा, यासाठी पैसे भरण्याच्या फंदात पडतात. काहीजण प्रभाव पाडण्यासाठी पैसे मोजतायत.कऱ्हाडला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यापासून तर अनेकांनी असे आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी रिघच लावलेली दिसते. दरवर्षी आगाऊ रक्कम भरून ‘व्हीआयपी’ क्रमांक मिळविणाऱ्यांमध्ये वाढच होताना दिसते. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ अखेर १ हजार ५९१ जणांनी वाहनांना आकर्षक क्रमांक घेतले होते. त्यासाठी त्यांनी एकूण १ कोटी ३ लाख ४८ हजार ७२५ रुपये भरले. त्यानंतर १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ अखेर १ हजार ३१३ एवढ्या वाहनधारकांनी ८० लाख ६३ हजार ८४४ रूपये भरून ‘व्हीआयपी’ क्रमांक घेतले आहेत. तसेच एमएच ५० च्या पुढे १ हा क्रमांक मिळविण्यासाठी सध्या अनेक बिल्डर, व्यापारी, व्यावसायीक तसेच राजकारण्यांमध्येही चढाओढ लागलेली पहावयास मिळते. सध्या एमएच ५० ची कारसाठीची ‘एल’ सिरीज सुरू आहे. आत्तापर्यंत ‘एमएच ५० एफ’ पर्यंत १ या क्रमांकाची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ‘एमएच ५० - १’, ‘एमएच ५० ए १’, ‘एमएच ५० बी १’ , ‘एमएच ५० सी १’, ‘एमएच ५० डी १’, ‘एमएच ५० ई १’ आणि ‘एमएच ५० एफ १’ या क्रमांकासाठी वाहनधारकांनी पैसे भरलेत. वेगवेगळ्या वाहनधारकांनी या १ क्रमांकासाठी भरलेली आत्तापर्यंतची रक्कम साडेआठ लाखापर्यंत पोहोचली आहे. नंबर ‘व्हीआयपी’; प्लेट ‘फॅन्सी’नोंदणीचा क्रमांक लिहिण्यासाठी प्रत्येक वाहनाला नंबरप्लेट असते; पण सध्याबहुतांश वाहनांच्या प्लेटवर आकड्यांऐवजी अक्षरच ठळक दिसतायत. आकड्यांची मोडतोड करून कुणी पडनावाची जुळणी करतोय तर कुणी आडनावाचा रूबाब दाखवतोय. काहींनी ‘लव्ह’ साकारलंय, तर देवतांची नावं टाकून काहींनी श्रद्धाळूपणा दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आडनाव, पडनावांची भलतीच ‘क्रेझ’आकड्यांच्या माध्यमातून शब्द तयार करतानाही ‘दादा’, ‘मामा’, ‘भाऊ’, ‘तात्या’, ‘आबा’, ‘बाबा’ अशी पडनाव किंवा ‘पाटील’, ‘पवार’ अशी आडनाव साकारली जातायत़ आकड्यांची मोडतोड करून नाव साकारण्यासाठी काही ठराविक रेडीअम व्यावसायिक प्रसिद्ध आहेत़ त्यामुळे अशा नंबरप्लेट तयार करण्यासाठी वाहनधारकांची संबंधित व्यावसायिकाकडेच रीघ लागलेली असते़‘एक’च नंबर तीन लाखांचाउपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहनासाठी १ क्रमांक घ्यायचा असेल तर चारचाकीधारकाला तीन लाख तर दुचाकीधारकाला पन्नास हजार रुपये मोजावे लागतात. त्याचबरोबर ९, ९९, ९९९, ७८६ यासारख्या क्रमांकासाठी चारचाकीधारकाला दीड लाख तर दुचाकीधारकाला ५० हजार. १११, २२२, ३३३ यासारख्या सिरीजच्या क्रमांकासाठी चारचाकीधारकाला ७० हजार तर दुचाकीधारकाला १५ हजार रुपये भरावे लागतात. इतर क्रमांकासाठी वेगवेगळी रक्कम आकारली जाते.आधी एक लाख; आता तीन लाखकारला १ क्रमांक मिळविण्यासाठीची पुर्वीची फी १ लाख रूपये होती. १५ मे २०१३ पर्यंत कारधारकाने १ लाख रूपये भरले की त्याला एमएच ५० च्या पुढे १ हा क्रमांक दिला जायचा. तर दुचाकीधारकाला त्यासाठी १५ हजार रूपये भरावे लागायचे. मात्र, १६ मे २०१३ पासून या क्रमांकासाठीची फी वाढविण्यात आली. सध्या कारधारकाला तीन लाख तर दुचाकीधारकाला १ या क्रमांकासाठी ५० हजार रूपये भरावे लागतात.