सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रूग्णसंख्येत रविवारी घट झाली. दिवसभरात १७६ नवीन रूग्ण आढळून येतानाच परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील ७ अशा ९ जणांचा मृत्यू झाला. तर ३२३ जण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यातील ७ जणांचा मृत्यू झाला. त्यात मिरज १, तासगाव तालुक्यातील ३, खानापूर २ आणि कडेगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत घट होत असून, १७६५ जण उपचार घेत आहेत. त्यातील ४७९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४०६ जण ऑक्सिजनवर तर ७३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य यंत्रणांनी रविवारी आरटीपीसीआर अंतर्गत १,७८२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ६३ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३,६४० जणांच्या नमुने तपासणीतून ११७ जणांना कोरोनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू तर नवीन चार रूग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १९५७७०
उपचार घेत असलेले १७६५
कोरोनामुक्त झालेले १८८८४९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५१५६
रविवारी दिवसभरात
सांगली २६
मिरज ६
आटपाडी २८
कडेगाव २०
खानापूर ३८
पलूस ८
तासगाव ७
जत १८
कवठेमहांकाळ ३
मिरज तालुका ५
शिराळा ६
वाळवा ११