लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पद्मभूषण क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त ९९ नारळरोपांची रोपवाटिका तयार केली आहे.
प्रारंभी पद्मभूषण क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक एस. ए. गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कोविडचे नियम पाळून कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी एस. एस. आंबी, व्ही. के. ठोंबरे, संदीप अडिसरे, किरण शिंदे, एम. एस. पाटील, विजय नांगरे, रोहिणी नाईक, मंगल मोकाशी, वैभव मोहिते, जी. जी. पाटील उपस्थित होते. आर. डी. लुगडे यांनी आभार मानले.
मणदूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच वसंत पाटील, पांडुरंग पाटील, शिवाजी पाटील, अंगणवाडी सेविका, शिक्षिका व ग्रामस्थांनी नागनाथअण्णांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. करूंगली ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले.