सांगली : आगामी निवडणुकीत ओबीसी समाज हा निर्णायक भूमिकेत असणार आहे. प्रत्येक पक्षांने ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व देऊन लढण्याची संधी द्यावी. त्या मिळालेल्या संधीचं विजयात रूपांतर करून ओबीसी बांधव संधीच सोने करतील.संधी नाही मिळाल्यास ओबीसींनी कोणाला मत द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे ठरवलं असून त्याची यादी फिक्स असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी आणि भविष्यातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज सांगलीतील हरिप्रिया मंगल कार्यालयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसीची संवाद बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.हाके पुढे म्हणाले की, यावेळी पहिल्यांदा ओबीसी, एससी एसटी आणि अल्पसंख्यांकांना मतदान करेल. काँग्रेसचे देशाचे नेते राहूल गांधी ओबीसींची जात निहाय जनगणना करावी असं म्हणतात आणि त्यांचेच नेते महाराष्ट्रात एक ब्र शब्दही बोलायला तयार नाहीत. यावेळी ओबीसी समन्वयक संजय विभुते, समन्वयक माजी नगरसेवक विष्णू माने, समन्वयक तथा माजी महापौर संगीता खोत ,माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका सविता मदने, कल्पना कोळेकर, वर्षा निंबाळकर,माजी समाज कल्याण सभापती आकाराम मासाळ,विठ्ठल खोत,सुनील गुरव, जगन्नाथ माळी, संग्राम माने, नंदु निळकंठ आदींसह ओबीसी बांधव उपस्थित होते.दुटप्पी नेत्यांबद्दल राहुल गांधी यांच्याशी बोलणारहाके म्हणाले, दुहेरी भूमिका घेणाऱ्या नेत्यांविषयी तसेच त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलत काँग्रेस कशी संपवली, याविषयी पुढील आठवड्यात राहुल गांधी यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत आपण कोणताही आडपडदा न ठेवता बोलणार आहे.
आगामी विधानसभेसाठी 'ओबीसी' निर्णायक भूमिकेत - लक्ष्मण हाके
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 2:16 PM