मिरज : मिरज तालुक्यात टंचाई परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांनी पाणी सोडण्याबाबत अन्याय केल्याचा आरोप सदस्यांनी पंचायत समिती सभेत केला. जनावरांच्या चाºयाबाबत चुकीचा अहवाल सादर करून अधिकाºयांनी दिशाभूल केल्याचेही सदस्यांनी सांगितले. दुष्काळी प्रश्नावर काँग्रेस व राष्टÑवादीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिकारी निरुत्तर झाले.
पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी सभापती शालन भोई यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती विक्रम पाटील, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. कक्ष अधिकारी संजय शिंदे यांनी आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत पाणी टंचाई व म्हैसाळचे पाणी सोडण्याबाबत अन्याय झाल्याची तक्रार करीत काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अधिकाºयांची खरडपट्टी काढली. मिरजपूर्व भागात मार्चपासून दुष्काळाची तीव्रता वाढल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला. आजही मागणी असतानाही चारा छावणी सुरु होत नाही. तालुका कृषी व पशुसंवर्धन विभाग याला जबाबदार आहे. तालुक्यात चारा उपलब्ध असल्याचा अहवाल या विभागांनी जानेवारीत प्रशासनाला दिल्याने चारा छावणी सुरु झाली नाही. छावणीची वाट पाहून शेतकºयांनी कवडीमोल किमतीने जनावरे विकली. तालुक्यात एक हजार हेक्टर चारा उपलब्ध असल्याचा अहवाल देणाºया अधिकाºयांनी चारा दाखवावा, असा जाब विचारला. चुकीचा अहवाल देणाºया अधिकाºयावर कारवाईची मागणी अनिल आमटवणे व अशोक मोहिते यांनी केली.
आमटवणे म्हणाले, टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्यासाठी म्हैसाळ योजनेतून त्या गावातील तलाव व बंधारे भरुन घेण्याचे आदेश दिले असताना, पाणी सोडण्यात मनमानी केली. त्यामुळे टँकर सुरु करावे लागत आहेत. म्हैसाळच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर पाणी टंचाईचे निवारण झाले असते. तालुक्यात म्हैसाळ योजनेच्या पाण्याने तलाव व बंधारे भरावेत व चारा छावण्या सुरू कराव्यात.
मिरजपूर्व भागातील रस्ता कामासाठी आघाडी शासनाने १८ कोटीचा निधी दिला. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी झाल्याने कामाची चौकशी केल्यानंतर ठेकेदारास बिले न देण्याचा पंचायत समितीच्या सभेत ठराव होऊनही टक्केवारीसाठी बिले देण्यात आली. सभेतील ठरावाला किंमत आहे का नाही, असा जाब आमटवणे, मोहिते, कृष्णदेव कांबळे, रंगराव जाधव, सतीश कोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना विचारला. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही.दुष्काळाकडे आमदारांचे दुर्लक्षजिल्ह्यातील अन्य आमदारांनी तालुक्याच्या दुष्काळ निवारणाच्या आढावा बैठका घेऊन उपाययोजनेचे नियोजन केले. मात्र मिरज तालुक्यात भीषण दुष्काळ असताना आ. सुरेश खाडे यांनी एकही आढावा बैठक घेतली नाही. राजकीय द्वेषापोटी शेतकºयांचा वीजपुरवठा तोडण्यात त्यांना रस आहे. मात्र दुष्काळ निवारणाबाबत आमदारांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप अनिल आमटवणे यांनी केला.