लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शंभरफुटी हनुमाननगरसह उपनगरांमधील पाणीटंचाईवरून गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत जोरदार खडाजंगी झाली. टंचाईचे कारण देताना पाणीपुरवठा अधिकारी शीतल उपाध्ये आणि शरद सागरे या दोन्ही अधिकाºयांमध्ये आयुक्तांसमोरच वादावादी झाली. आयुक्तांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत, दोन्ही अधिकाºयांना कार्यमुक्त का करू नये, अशा नोटिसा बजावण्याचे आदेश कामगार अधिकाºयांना दिले.सभापती संगीता हारगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. आयुक्त सुरुवातीला उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीवरून संताप व्यक्त करीत सदस्य राजू गवळी यांनी अर्धा तास सभा रोखली. आयुक्त आल्यानंंतर पुन्हा सभा सुरू झाली. त्यानंतर शंभरफुटी व त्याठिकाणच्या उपनगरांमधील पाणीटंचाईबाबत दिलीप पाटील व गवळी यांनी प्रश्न उपस्थित केला.ते म्हणाले की, हनुमाननगर, रामकृष्ण सोसायटी, आप्पासाहेब पाटीलनगर, त्रिमूर्तीनगर, लक्ष्मीनारायण कॉलनी, आदी परिसरात ऐन पावसाळ्यातही पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. मागील स्थायी समिती सभेत याबाबत आयुक्तांशी विचारणा केल्यानंतर, तत्काळ पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. तेव्हा दोन दिवस कसेबसे पाणी आले; परंतु पुन्हा आठवड्याभरात ११0 टँकर देण्यात आले. परिसरातील सुमारे २५ नागरिक याबाबत जाब विचारण्यासाठी सभेच्या ठिकाणी आले होते. त्यांना कसेबसे थांबविण्यात आले. सभापतींच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जाते, उपयोग काय? हा प्रश्न मिटल्याशिवाय सभा चालू देणार नाही.त्यानंतर यासंदर्भात खुलासा करताना उपाध्ये व सागरे या दोन्ही पाणीपुरवठा अधिकाºयांमध्ये जुंपली. उपाध्ये यांनी, माळबंगला येथील ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असल्याचे सांगितले. शिवाय आपल्या प्रभागात १६0 मीटर पाण्याची पाईपलाईन टाकल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही, असेही सांगितले. मात्र, सागरे यांनी हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीही संबंध नाही असे सांगत, उपाध्ये खोटे सांगून दिशाभूल करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यामुळे आयुक्तांनाही या घटनेचे आश्चर्य वाटले. त्यांनी लगेचच कामगार अधिकारी चंद्रकांत आडके यांना बोलावून दोघांनाही नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. त्यामुळे स्थायी सभेत अधिकाºयांमध्ये काही काळ तणाव दिसत होता.अधिकाºयांना लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पगार मिळतो की, भांडणासाठी, असा जाब आयुक्तांनी विचारला. यावेळी गवळी म्हणाले, अधिकाºयांचे काहीही करा; पण पाणीप्रश्न संपणार कधी? याचा खुलासा करा. खेबूडकर यांनी यासंदर्भात सायंकाळी तातडीची पाणीपुरवठा बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये तोडगा निघेल, असे स्पष्ट केले.डॉ. कवठेकर, आंबोळे यांना पुन्हा नोटिसासमडोळी रस्त्यावरील कचरा डेपोत कत्तलखान्याचा कचरा टाकणारी गाडी पकडली होती. त्या गाडीमालकावर फौजदारी दाखल करण्याबाबत यापूर्वीही सभेत आदेश झाले; पण महिना उलटून गेल्यानंतरही कारवाई न केल्याबद्दल सभेत पुन्हा जाब विचारला. त्यामुळे सभेतून बाहेर पडत डॉ. संजय कवठेकर व डॉ. आंबोळे यांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगून, कारवाईस दिरंगाईबद्दल पुन्हा डॉ. कवठेकर आणि डॉ. आंबोळे यांना निलंबनाबाबत नोटिसा देण्यात आल्या, असे दिलीप पाटील यांनी सांगितले.
पाणीप्रश्नावरून अधिकाºयांत जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:57 PM