शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

सांगली शहरात पुराने टाकला दम; टिळक चौक, कोल्हापूर रोड खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 7:21 PM

शहरातील पुराने दम टाकला आहे. टिळक चौक, कोल्हापूर रोड या दोन्ही रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. बायपास रस्त्यावर मात्र अद्याप पाणी आहे.

ठळक मुद्देनदीकाठच्या भागात अद्यापही पाणी

सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास सुरूवात झाली असून, टिळक चौक, कोल्हापूर रोड वाहतुकीसाठी खुला झाला आहे. कृष्णा नदीकाठावरील जामवाडी, मगरमच्छ कॉलनी, शिवशंभो चौकासह, स्टेशन रोड, मारुती चौक, रामनगर, भारतनगर या परिसरात अद्यापही पुराचे पाणी आहे. शामरावनगरमधील काही भागात पाणी साचून आहे.

शहरातील पुराने दम टाकला आहे. टिळक चौक, कोल्हापूर रोड या दोन्ही रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. बायपास रस्त्यावर मात्र अद्याप पाणी आहे. त्यामुळे इस्लामपूरकडे जाणारी अवजड वाहतूक बंद आहे. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, ईदगाह मैदान, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी परिसरात अद्यापही पुराचे पाणी आहे. मारुती चौकातही चार ते पाच फूट पाणी आहे. टिळक चौकातील जनावरांच्या बाजारातील पाणी कमी झाल्याशिवाय मारुती चौक खुला होणार नाही.

स्टेशन चौकातही दोन ते तीन फूट पाणी आहे. ट्रक पार्किंगमध्ये पाणी असल्याने तेथील पाणी जाण्यास वेळ लागणार आहे. इतर भागातील पाणी बऱ्यापैकी ओसरले आहे. कोल्हापूर रोडवरील पाणी कमी झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पण शामरावनगरच्या अनेक भागात अद्यापही पाणी आहे. तेथील रस्त्यावरून पाणी वाहत आहे. शामरावनगरच्या पूर्वेकडील पूर ओसरला आहे, पण पश्चिम भागात मात्र पाणी साचून आहे. हे पाणी बाहेर काढण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.महापालिकेची कागदपत्रे भिजलीमहापालिकेच्या मुख्यालयातही पाच ते सहा फूट शिरले होते. त्यात लेखा विभाग खालच्या मजल्यावर असल्याने तेथील कागदपत्रे मोठ्या प्रमाणात भिजली आहेत. स्थायी समिती सभागृहातील फर्निचरचे नुकसान झाले आहे. तळमजल्यावर पंतप्रधान आवास योजना कक्ष, समाजकल्याण कक्ष, प्रशासकीय कार्यालय आहे. या कार्यालयातूनही पाणी शिरले होते.

टॅग्स :floodपूरSangliसांगली