सांगली : नाट्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक मुंबईत शुक्रवारी (दि. ३०) बोलावण्यात आली आहे. गेली चार वर्षे रखडलेल्या सांगलीतील १०० व्या नाट्य संमेलनाच्या आयोजनाचा विषय बैठकीच्या विषयपत्रिकेत आहे.मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला परिषदेचे तहहयात सदस्य, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही आमंत्रित केले आहे. मध्यवर्ती कार्यकारिणी, नियामक मंडळ आणि विश्वस्त मंडळ अशी बैठक होईल. दोन वर्षे कोरोना व टाळेबंदीमुळे संमेलन होऊ शकले नाही. कोरोना संपल्यानंतर नाट्य परिषदेत अध्यक्षपदावरुन धुमश्चक्री सुरु झाली. मार्चमध्ये निवडणुकीनंतर अध्यक्षपदीही दामले यांचीच निवड झाली. त्यांनी सुत्रे हाती घेताच रंगभूमीसाठी ठोस निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये १०० व्या संमेलनाचा विषय प्राधान्याने अजेंड्यावर आहे. शुक्रवारच्या बैठकीत त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.१०० वे संमेलन पुढील वर्षातचदरम्यान, शुक्रवारच्या बैठकीत १०० व्या संमेलनाविषयी सकारात्मक निर्णय झाला, तरी ते पुढील वर्षीच होण्याची शक्यता आहे.
सांगलीतील १०० व्या नाट्य संमेलनाचा विषय अजेंड्यावर, नाट्य परिषदेची ३० जूनला मुंबईत बैठक
By संतोष भिसे | Published: June 20, 2023 3:42 PM