सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गरजूंना लाभदायी ठरणाऱ्या शिवभोजन थाळीचे मोफत वितरण सुरू आहे. १५ एप्रिल ते १८ मे या कालावधीत एक लाख ५१ हजार २५२ जणांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत १२ लाख ७२ हजार ६१८ लाभार्थ्यांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. ---
रेशन कार्डधारकांना ऑनलाईन माहिती मिळणार
सांगली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा यादीतील कार्डधारकांना जर आपल्या कार्डवरती किती धान्य मिळते ते पाहायचे असेल तर याची माहिती संकेतस्थळावर मिळणार आहे. शासनाच्या संकेतस्थळावर ही सोय करण्यात आली आहे. यासह आधारकार्ड घेऊन जवळच्या रेशन दुकानात जाऊन १२ अंकी रेशनकार्ड नंबर माहिती करून घेवू शकता, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.
----
जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये वाढ
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन आता तालुकापातळीवर कोविड सेंटर सुरू करण्यास प्रशासनाने नियोजन केले आहे. ऑक्सिजनची सोय असलेल्या याठिकाणी लक्षणे नसलेल्या अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जत, नरसिंहगाव, तासगाव येथील सेंटरना भेटी देऊन पाहणी केली.