इस्लामपूर : भवानीनगर (ता. वाळवा) येथील टपाल कार्यालयाशेजारी बंद घर फोडून चोरट्यांनी १७ हजारांच्या रोकडसह पाच तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने अशा एक लाख ६६ हजार रुपये किमतीच्या ऐवजाची चोरी केली. चोरीची ही घटना मंगळवारी रात्री ते पहाटेदरम्यान घडली.
याबाबत अमर शंकर कांबळे (वय ३९, मूळ रा. भवानीनगर, सध्या वडणगे, ता. करवीर) या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसात फिर्याद दिली आहे. कांबळे व्यवसायानिमित्त वडणगे येथे राहत असल्याने ते गावी येऊन-जाऊन राहतात. चोरट्यांनी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी केली.
कांबळे यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील लक्ष्मीहार, गंठण, मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीची जोडवी, रिंगा अशा दागिन्यांच्या ऐवजासह १७ हजार ५०० रुपयांची रोकड चोरली. हवालदार दीपक ठोंबरे अधिक तपास करत आहेत.