शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Sangli: व्यापाऱ्याजवळील रोकड हातचलाखीने लांबविणारा अटकेत, कवठेमहांकाळ येथील घटना

By शरद जाधव | Published: October 18, 2023 7:08 PM

सांगली : कवठेमहांकाळ शहरातील किराणा दुकानदाराच्या गल्ल्यातील पैशांवर हातचलाखीने डल्ला मारणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. इम्रानआली यावरअली ...

सांगली : कवठेमहांकाळ शहरातील किराणा दुकानदाराच्या गल्ल्यातील पैशांवर हातचलाखीने डल्ला मारणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. इम्रानआली यावरअली बेग (वय २७, रा. कुडची जि. बेळगाव) असे संशयिताचे नावे आहे. त्याच्याकडून दुचाकी आणि रोकड असा ८४ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.कवठेमहांकाळ शहरातील अनिल दिगंबर सगरे यांचे ओढापात्रानजीक किराणा दुकान आहे. २७ सप्टेंबर रोजी संशयित बेग आणि त्याचा मेहूणा अबरार कोलामो बेग (रा. बरणपूर, मध्यप्रदेश) यांनी हातचलाखी करत सगरे यांच्या दुकानातील गल्ल्यातून ३६ हजार रुपयांची रोकड लांबविली होती. यातील ३४ हजार रुपये बेगजवळ आढळून आले.

जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील संशयितांवर कारवाईसाठी एलसीबीने तयार केलेले पथक सांगली शहरात गस्तीवर असताना, त्यांना ही माहिती मिळाली की, संशयित बेग हा सांगलीवाडी येथील टोलनाक्याजवळ थांबला आहे. त्यानुसार पथकाने तिथे जात ही कारवाई केली.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, अरूण पाटील, सुनिल जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी