कुरळप : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे जिन्यावरून जाऊ नकाे असे सांगितल्याने दीपक कृष्णात सुतार (वय १९. रा. येडेनिपाणी. ता. वाळवा) याला शशिकांत संभाजी खट्टे व नाड्या ऊर्फ साैरभ पाटील (रा. दाेघेही येडेनिपाणी) यांनी मारहाण केली. ही घटना १४ जानेवारी राेजी रात्री साडेनऊ वाजता घडली. याबाबत कुरळप पाेलीस ठाण्यात नाेंद आहे.
--------------
पृूर्ववैमनस्यातून एकास मारहाण
आष्टा : येथील वग्याणी प्लॉट परिसरात नदीम जहांगीर मुजावर (वय १९, रा. आझाद माेहल्ला आष्टा) याला राेहित फार्णे व अवधूत सावंत (दाेघेही रा. आष्टा) यांनी मारहाण केली. ही घटना १५ जानेवारी राेजी घडली. याबाबत आष्टा पाेलीस ठाण्यात नाेंद आहे.
--------------
खुजगावमध्ये पत्नीस मारहाण
काेकरुड : खुजगाव (ता. शिराळा) येथे घरातील टेपरेकॉर्डरचा आवाज कमी केल्याने संतापाच्या भरात प्रकाश निवृत्ती सावंत (वय ५८. रा. खुजगाव) याने पत्नी वैशाली प्रकाश सावंत (वय ४६) व मुलगा सूरज प्रकाश सावंत यांना बेदम मारहाण केली. ही घटना १५ जानेवारी राेजी सकाळी साडेआठ वाजता घडली. याबाबत काेकरुड पाेलीस ठाण्यात नाेंद झाली आहे.
-------------
दरीबडचीत महिलेस मारहाण
संख : दरीबडची (ता. जत) येथे शेतात जनावरे का साेडता. आमचे नुकसान हाेते, असा जाब विचारल्याने यल्लव्वा लाड्याप्पा दुधाळ (वय ४८) यांना पांडू सूर्यवंशी (रा. दरीबडची) याने मारहाण केली. ही घटना १५ जानेवारी राेजी घडली. याबाबत जत पाेलीस ठाण्यात नाेंद झाली आहे.
----------------
मद्यपी दुचाकीस्वारावर कारवाई
इस्लामपुर : शहरातील आष्टा नाका येथे दारूच्या नशेत दुचाकी (क्र. एमएच १० डीई ६९३०) चालविताना अमाेल अशाेक बेलेकर (वय ३२ रा. कामेरी. ता. वाळवा) याच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पाेलीस कर्मचारी राहुल शिंदे यांनी इस्लामपूर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.