शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

‘म्हैसाळ’साठी शिंदे कारखान्याकडून एक कोटी

By admin | Published: February 14, 2016 12:48 AM

कारखाना कार्यस्थळावर बैठक : बावीस गावांतील शेतकऱ्यांकडून पैसे कपात होणार

मिरज : म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी आरग येथील मोहनराव शिंदे कारखान्यातर्फे एक कोटी रुपये भरण्यात येणार आहेत. कारखान्यात आज झालेल्या बैठकीत म्हैसाळ योजनेसाठी प्रतिटन ५० रुपये कपात करून एक कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय झाला. अध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह २२ गावातील शेतकरी, जिल्हा परिषद, पं. स. सदस्य, पाणी संघर्ष समिती व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. मिरज पूर्व भागातील पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली असून, पाण्याअभावी बागायती पिके धोक्यात आली आहेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. या पार्श्वभूमीवर आज मोहनराव शिंदे कारखान्यात बैठक झाली. अध्यक्ष मनोज शिंदे म्हणाले, पाण्याअभावी शेतकरी व उसाचे पीक अडचणीत आहे. मिरज पूर्व भागातील क्षेत्रात ३५ टक्के ऊस व ६५ टक्के बागायती पिके आहेत. ऊस वाळून गेला, तर पुढील हंगामात कारखानासुध्दा अडचणीत येणार आहे. त्यामुळे ऊस बिलात प्रतिटन कपात व उर्वरित कारखान्यातर्फे देऊन एक कोटी रुपये जमा करण्याची त्यांनी घोषणा केली. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी जत कारखान्यानेही एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. मोहनराव शिंदे कारखान्याचे ४१५ कर्मचारी म्हैसाळ योजनेसाठी एक दिवसाच्या वेतनाची १ लाख ६० हजार रुपये रक्कम देणार असल्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील यांनी सांगितले. कारखान्याने आजपर्यंत १ लाख १५ हजार टन उसाचे गाळप केले असून, प्रतिटन ५० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या बिलातून कपात करून सुमारे ६० लाख रुपये जमा होणार आहेत. उर्वरित ४० लाख रुपये कारखान्यातर्फे देऊन यापुढे होणाऱ्या गाळपातून वसूल केले जाणार आहेत. ऊस बिलातून कपात करून म्हैसाळ योजनेची थकबाकी भरण्याचा व कपातीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी झाल्यास गावपातळीवर त्यांना समजावण्याचा बैठकीत निर्णय झाला. दि. १६ रोजी कारखान्याकडून १ कोटी रुपये म्हैसाळच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहेत. बैठकीस तालुका काँग्रसे अध्यक्ष अमरसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे, प्रकाश देसाई, पंचायत समिती सदस्य शंकर पाटील, खंडेराव जगताप, तानाजी पाटील, वसंत गायकवाड, अरुण गतारे, लक्ष्मीवाडीचे सरपंच दाजी खोत, शेतकरी संघटनेचे बी. आर. पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)