वारणावती : शिराळा तालुक्यातील १०० टक्के जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी केले. तसेच जिल्हा परिषद शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्या ॲक्टिव्ह झाल्या तर शिक्षणात मोठी क्रांती घडू शकते, असेही ते म्हणाले.
आरळा (ता. शिराळा) येथील सिद्धार्थनगरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण कार्यक्रमात बाळासाहेब नायकवडी बोलत होते. ते पुढे म्हणाले, समाजाच्या सहकार्याने व ॲक्टिव्ह व शिक्षक यामुळे शाळांची रुपडे पालटत आहे. शिक्षकांची कल्पकता आणि समाजाचे सहकार्य असले की शाळा नावारूपाला येते. शासनाने माॅडेल शाळा करण्याच्या धोरणाच्या दुप्पट शाळा माॅडेल शाळा झाल्या पाहिजेत.
यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळ म्हणाले की, शिक्षकांनी मुलांना शाळेबद्दल प्रेम व आपुलकी निर्माण झाली पाहिजे, असे शिक्षण दिले पाहिजे.
यावेळी आरळाच्या केंद्रप्रमुख मधुमंती धर्माधिकारी, अलिशा मुलाणी, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते. मोहन पवार यांनी स्वागत केले.