लोकमत न्यूज नेटवर्कजत : शेतजमीन व रस्त्याच्या वादातून बिरू बाबू ठवरे (वय ५०, रा. घाटगेवाडी, ता. जत) यांचा त्यांच्या चुलत भावासह चारजणांनी कुºहाड, काठी व दगडाने मारहाण करून खून केला. ही घटना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान ठवरे यांच्या शेतजमिनीत घडली.याप्रकरणी त्यांचा मुलगा भीमराव बिरू ठवरे यांनी रविवारी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बिरू ठवरे व रावसाहेब ठवरे हे दोघे सख्खे चुलतभाऊ आहेत. त्यांच्यात मागील आठ वर्षांपासून शेतजमीन व रस्त्याचा वाद आहे. रविवारी दुपारी बिरू ठवरे शेतातील उडीद काढत असताना त्यांच्यात याच कारणावरून पुन्हा वाद झाला. यावेळी रावसाहेब ठवरे, त्यांचा मुलगा पवन ठवरे, पत्नी रुक्मिणी ठवरे, बहीण पमाबाई कटरे या चारजणांनी मिळून कुºहाड, काठी व दगडाने त्यांना मारहाण केली. यामध्ये बिरू ठवरे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना मिरज येथे दाखल केले होते, परंतु उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी वरील चार संशयितांना रविवारी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आर. ए. ताशीलदार करीत आहेत.
शेतजमिनीच्या वादातून घाटगेवाडीत एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:54 PM