शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

Sangli: नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच अपघात, म्हैसाळ-मिरज रोडवर ट्रक्टर-कारच्या धडकेत एक ठार, एक जखमी

By अविनाश कोळी | Published: January 02, 2024 4:59 PM

अपघात इतका भयंकर होता की, ट्रॅक्टरचा समोरील भाग तुटून वेगळा झाला

म्हैसाळ : मिरज-म्हैसाळ रस्त्यावर देवल फार्मजवळ उसाची मोकळी ट्रॅक्टर व कारच्या धडकेत ट्रॅक्टरचालक आमसिध्द रावसाहेब देवकाते (वय ३० रा. तिकोडी ता. जत) हा ठार झाला, तर कारचालक इम्रान अल्लाबक्ष शेख (वय ३२ रा.मांजरी कर्नाटक) हा जखमी झाला आहे. सोमवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, म्हैसाळ हून मिरजेकडे ट्रॅक्टर चालला होता. तर मिरजेकडून एक कार म्हैसाळच्या दिशेने जात होती. यावेळी देवल फार्म हाऊस जवळ दोन्ही गाड्यांची धडक झाली. अपघात इतका भयंकर होता की, ट्रॅक्टरचा दर्शनी भाग तुटून वेगळा झाला. कारचाही चक्काचूर होऊन कार रस्ताकडेच्या शेतात जाऊन पडली होती. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. याबाबत अधिक तपास बळीराम पवार हे करीत आहेत.

नवीन वर्षाची सुरूवात अपघातानेच सोमवारी नवीन वर्षाची सुरुवात झाली. याच रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. रात्र असल्याने गावात या अपघाताची माहिती जास्त पसरली नाही. मात्र मंगळवारी म्हैसाळ मधील नागरिक नोकरीनिमित्त या रस्तावरून प्रवास करताना ट्रॅक्टर व कारची अवस्था पाहून नवीन वर्षाची सुरुवात अपघातानेच झाली, अशी खंत या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू