शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘एकच मिशन, सरकारी कर्मचाऱ्यांना नो पेन्शन’; सांगलीत बेरोजगार तरुण, विविध संघटनांचे धरणे आंदोलन 

By अशोक डोंबाळे | Updated: March 23, 2023 18:47 IST

खासदार, आमदारांच्या पेन्शनमध्ये बदल करा

सांगली : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करू नये, खासदार व आमदारांच्या पेन्शनमध्ये बदल करा आणि शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा, या प्रमुख मागण्यांसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज गुरुवारी सांगलीतील स्टेशन चौकात धरणे आंदोलन केली. ‘एकच मिशन, सरकारी कर्मचाऱ्यांना नो पेन्शन’ अशा घोषणाही देण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, विकास सूर्यवंशी, रुपेश मोकाशी, हेमंत मोरे, प्रवीण कोले, अशोक कोकळेकर, तोहीद शेख, नानासाहेब पाटील, अरुण पाटील, विनोद पाटील, रामदास कोळी, नितीन चव्हाण आदींसह शेकडो तरुण आंदोलनात सहभागी होते.आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हवी असेल तर त्यांना सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याची गरज नाही. शासकीय कार्यालयात येणाऱ्यांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. तसेच आपले कर्तव्य अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे पूर्ण करतात का, याचेही मूल्यांकन झाले पाहिजे. तसेच कर्मचाऱ्याचा अपघाती, नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यांच्या पश्चात्य वारसाला पेन्शन लागू झाली पाहिजे आदीसह १७ मागण्यांसाठी बेरोजगार तरुण, विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केले.

आंदोलकांच्या मागण्या- सन्मानाने जगता येईल इतकी पेन्शन योजना लागू करा.- वेतनवाढ व इतर भत्ते, लाभ देताना कामाचे मूल्यांकन करा.- सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण करू नये.- स्वच्छता, कामगार, आरोग्य सेवांना सवलती द्या.- परिचारिक, आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस, सेविका, कंत्राटी कामगारांना सरकारी नोकरीत सामावून घ्या.- वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते, रिक्षाचालक, भाजीपाला विक्रेते, हातगाडी चालकांना पेन्शन द्या.

खासदार, आमदारांच्या पेन्शनमध्ये बदल करामाजी आमदार, माजी खासदारांच्या आर्थिक परिस्थितीनुसार पेन्शनमध्ये बदल केला पाहिजे. तसेच आमदार-खासदारांचे पगार, भत्ते यावरील खर्च तातडीने कमी करण्याची गरज आहे, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतनagitationआंदोलन