संख : संत निरंकारी मिशनच्यावतीने दिल्लीत सत्संग भवनामध्ये कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी १ हजार बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. रुग्णांची व्यवस्था संत निरंकारी मिशनकडून करण्यात येत आहे. अशी माहिती सांगली संयोजक जालिंदर जाधव यांनी दिली.
सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने देशातील सत्संग भवन कोविड लसीकरण केंद्रांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून मिशनची देशातील भवन कोविड लसीकरण व ‘कोविड ट्रिटमेंट सेंटर’मध्ये परिवर्तित करण्यात येत आहेत. सत्संग भवन क्वारंटाईन सेंटर म्हणून उपलब्ध करून दिले आहे.
संत निरंकारी मिशनकडून राशन-लंगर वाटप, पंतप्रधान सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधींमध्ये आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच रक्तदान शिबिर, पीपीई किटस, मास्क, सॅनिटायझर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिले आहे.