चिंचणी (ता. कडेगाव) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये उभारलेल्या अत्याधुनिक संगणक कक्षाचे उद्घाटन शरद लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब जाधव व नारायण पाटील उपस्थित होते. चिंचणी येथील पंकज औताडे यांनी शाळेला इंटरनेटवर मोफत दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
शरद लाड म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे विविध क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संधींचा लाभ घ्यायचा असल्यास संगणक साक्षरता सर्वांपर्यंत पोहोचायला हवी.
मुख्याध्यापक एस.व्ही. पाटील,
सहायक शिक्षक राहुल कुंभार, माणिक गोतपागर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच मनीषा माने, उपसरपंच दीपक महाडिक, विश्वास महाडिक, वैभव पवार, संदेश जाधव, लालासाहेब महाडिक, प्रकाश पाटील उपस्थित होते. एस.एस. अलुगडे यांनी सूत्रसंचालन केले. सी.आर. बाबर यांनी आभार मानले.
फोटो-१३कडेगाव१
फोटो ओळ : चिंचणी (ता. कडेगाव) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये संगणक कक्षाची शरद लाड यांनी पाहणी केली. यावेळी मनीषा माने, नारायण पाटील, एस.व्ही. पाटील आदी उपस्थित होते.