शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
2
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
3
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
4
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
5
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
6
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती
7
LLC 2024 : जणू काही 'लसिथ मलिंगा'! मराठमोळ्या केदार जाधवच्या गोलंदाजीने जुन्या आठवणींना उजाळा
8
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
9
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
10
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
11
महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका
12
Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!
13
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
14
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
15
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
16
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
17
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
18
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
19
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान

सांगली बाजार समितीमध्ये हळदीच्या ऑनलाईन लिलावास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 11:54 AM

हळदीच्या उघड पध्दतीने लिलावाच्या प्रसंगी अनेक खरेदीदार, आडते, हमाल एकत्र येत असतात. त्यामुळे सामाजिक अंतर राखणे शक्य होत नव्हते. शेतकऱ्यांचे हित विचारात घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हळदीचे ऑनलाईन सौदे करण्याबाबत आदेश निर्गमित केले होते.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सुचित केले होते

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी  सांगली बाजार समितीस भेट देवून हळदीचे सौदे उघड पध्दतीने घेण्याऐवजी ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत सुचित केले होते. त्यास अनुसरून दि. 29 एप्रिल पासून ऑनलाईन पध्दतीने हळदीच्या लिलावास सुरुवात झाली  आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे 193 व्यापारी असून जवळपास 130 आडते कार्यरत आहेत.मागील दीड महिन्यापासून हळदीचे सौदे रखडलेले होते. तसेच शेतकऱ्यांची हळद त्यांच्याकडेच पडून असल्यानेसौद्याअभावी त्यांना हळदीची विक्री करण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. हळदीच्या उघड पध्दतीनेलिलावाच्या प्रसंगी अनेक खरेदीदार, आडते, हमाल एकत्र येत असतात. त्यामुळे सामाजिक अंतर राखणे शक्य होतनव्हते. शेतकऱ्यांचे हित विचारात घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हळदीचे ऑनलाईन सौदेकरण्याबाबत आदेश निर्गमित केले होते.

ई-नाम लिलाव प्रक्रियेमध्ये आडत्याच्या दुकानासमोर शेतकरी निहाय व हळदीच्या गुणवत्तेनुसार नमुनेठेवले जातात. ज्यावर ई-नाम पोर्टलवरून प्राप्त झालेली विशिष्ट क्रमांकाची पावती ठेवलेली असते. सदर पावतीवरशेतकऱ्याचे नाव, आडत्याचे नाव, हळदीचा प्रकार व परिमाण इत्यादी माहिती खरेदीदारास उपलब्ध होवू शकते.बाजार समितीने निश्चित केलेल्या वेळेमध्ये ई-नाम या पोर्टलवर नोंदणीकृत खरेदीदार हळदीचे नमुने पाहू शकतातव त्यांनी खरेदी करावयाच्या लॉट साठी त्यांची किंमत ऑनलाईन मोबाईल फोनवरून अथवा संगणकावरून नमुदकरू शकतात.

सौद्याची वेळ संपल्यानंतर ज्या खरेदीदाराने सर्वाधिक बोली लावलेली आहे त्यांचा सौदा संगणकीयप्रणालीद्वारे निश्चित केला जातो. त्यानंतर सर्वाधिक बोलीच्या रक्कमेस विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने संमतीदिल्यानंतर तो व्यवहार पूर्ण होतो. अशा ऑनलाईन सौदे प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या खरेदीदारांना एकाच वेळीएकत्र येण्याची आवश्यकता नसून विहीत वेळेमध्ये त्यांच्या सवडीनूसार येवून खरेदी करावयाच्या मालाची पाहणीकरू शकतात. या पध्दतीमुळे बाजार समितीच्या आवारामध्ये सामाजिक अंतर राखण्यास मदत होणार आहे. तसेचकितीही मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक झाली तरी एकाच दिवसामध्ये सौदे प्रक्रिया पूर्ण होवू शकणार आहे, असेजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगीतले.

सांगली बाजार समिती मार्फत ई-नाम योजनेंतर्गत लिलाव होईपर्यंत ६० खरेदीरारांनी रजिस्ट्रेशन केलेलेहोते. बुधवारी झालेल्या लिलावामध्ये एकूण ५ अडत्यांकडील २०७ शेतकऱ्यांची २५०० क्विंटल हळदीचे २१४ लॉटचे सौदे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. ऑनलाईन सौद्यामध्ये सर्वाधिक ९ हजार ९ रूपये व सर्वात कमी ४ हजार३०० रूपये प्रती क्विंटल भाव मिळालेला आहे. या लिलाव प्रक्रियेदरम्यान बाजार समितीचे सभापती दिनकरपाटील व जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे उपस्थित होते.

यापुढेही हळदीचे सौदे ऑनलाईन पध्दतीने होणार असून जास्तीत जास्त खरेदीदाराने ऑनलाईन सौदेप्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या हळदीसाठी अधिकाधिक भाव मिळविण्यासाठी त्यांची हळदबाजार समितीमध्ये आणावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी