अशोक डोंबाळे ल्ल सांगलीजिल्ह्यातील मध्यम पाच प्रकल्पांपैकी चार प्रकल्प कोरडे ठणठणीत असून मोरणा प्रकल्पात केवळ ११ टक्के पाणीसाठा आहे. लघु ८४ प्रकल्पांपैकी १४ प्रकल्प कोरडे पडले असून उर्वरित प्रकल्पांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जत, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील बहुतांशी तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे कूपनलिका, विहिरींनी तळ गाठला आहे. येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ३१ टँकरद्वारे पिण्याचा पाणी पुरवठा केला जात आहे.दुष्काळी भागामध्ये परतीचा पाऊस चांगला झाला तरच तेथील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा होतो. या पाणीसाठ्यावर वर्षभर गावातील ग्रामस्थांची आणि पशुधनाची तहान भागत असते. पण परतीचा पाऊस पुरेसा झाला नसल्यामुळे प्रकल्प कोरडेच पडले आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठाही कमी होऊ लागला आहे. कूपनलिका आणि विहिरींनी तळ गाठल्यामुळे दुष्काळी तालुक्यांमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे. पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. शेळ्या-मेंढ्यांना पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील मेंढपाळांनी कृष्णा, वारणा नदीकाठाकडे स्थलांतर केले आहे.यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असतानाही पाणी टंचाईची तीव्रता एप्रिलमध्येच जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सध्या ३१ पाणी टँकर सुरू असून मागणीही वाढतच आहे. खानापूर, जत, तासगाव या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या गावांमध्ये टँकरची मागणी वाढू लागली आहे. धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिना बाकी असताना, टँकरची मागणी वाढू लागल्यामुळे प्रशासनही चिंतेत आहे.लघु प्रकल्पांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)तालुकाप्रकल्प संख्याप्रकल्पाची क्षमतासध्याचा पाणीसाठाटक्केतासगाव७७०९.०६१०५.०८१५खानापूर९७१२.४२१८८.४८२६कडेगाव६७१४.६८३००.००४२शिराळा५३५९.०९२७३.३०३४आटपाडी१३१३६७.२८२६७.०७२०जत२८३७१५.२३२१८.९५६क़महांकाळ११९५५.९६६८.७९७मिरज३१४१.८६४४.६५३१वाळवा२५१.८४८.३३१६एकूण८४९४३९.९६१५६०.४४१७
जिल्ह्यात १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक
By admin | Published: April 08, 2017 12:02 AM