शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

पाणी जपून वापरा, सांगली जिल्ह्यात २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक

By अशोक डोंबाळे | Published: February 07, 2024 3:49 PM

दुष्काळी तीव्रता वाढली : विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला 

अशोक डोंबाळेसांगली : यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे यंदा लवकरच टंचाईचे ढग येण्याची भीती आहे. जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांत केवळ २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांची चिंता जिल्हावासीयांना लागली असून, पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ आली आहे.यंदाच्या पावसाळ्यात उशिरा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्याही उशिरा झाल्या. साधारणत: जूनअखेरपासून पेरणीस सुरुवात झाली. रिमझिम पाऊस झाल्याने पिकांची चांगली उगवण झाली; मात्र पाणीसाठ्यात कुठलीही वाढ झाली नाही. जिल्ह्यात मध्यम आणि लघु ८३ प्रकल्प असून त्याची नऊ हजार ४४० दशलक्ष घनफूट पाणी साठविण्याची क्षमता आहे. या प्रकल्पांमध्ये सध्या दोन हजार १९८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे.सिद्धेवाडी (ता. तासगाव), मोरणा (ता. शिराळा), दोड्डनाला, संख (ता. जत), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ) या मध्यम प्रकल्पात गतवर्षी ७० टक्के तर सध्या केवळ १९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. ७८ लघुप्रकल्प असून त्यामध्ये गतवर्षी ६५ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी ३१ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

१७ तलाव कोरडेतासगाव तालुक्यात एक, आटपाडी दोन, जत ११, कवठेमहांकाळ तीन असे १७ तलाव कोरडे पडले आहेत. तसेच मिरज तालुक्यातील एक, खानापूर तीन, तासगाव एक, जत चार आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील दोन तलावांमध्ये मृत पाणीसाठा आहे. पिण्यासाठी पाणी उपयोगी नाही, अशी स्थिती आहे. यामुळे या परिसरातील पिकं वाळली असून पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.

आटपाडी, जत तालुक्यातील ५४ गावांना टँकरने पाणीजत तालुक्यातील निगडी खु., शेड्याळ, सिंदूर, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सोन्याळ, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव, संख, जाडरबोबलाद, काराजनगी, उमराणी, तिकोंडी, बेळोडंगी, मोकाशेवाडी, टोणेवाडी, माडग्याळ, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खु., कागनारी, दरीबडची, कोलगिरी, को.बोबलाद, लमाणतांडा, केरेवाडी, व्हसपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, दरिकुणूर, सिद्धनाथ, सुसलाद, पांडोझरी, सोरडी, खोजनवाडी, तिल्ल्याळ, गोंधळेवाडी, अंकलगी, मोटेवाडी आदी ५० गावांमध्ये आणि आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी, पुजारवाडी, विठ्ठलापूर, उंबरगाव या गावांसह ५४ गावांमध्ये टँकर सुरू आहेत.

प्रकल्पातील (तलाव) पाणीसाठ्याची स्थिती

तालुका पाणीसाठा तलाव 
तासगाव १८
खानापूर १९
कडेगाव ४६
शिराळा ४६५ 
आटपाडी ४९१३
जत १८२७ 
क.महांकाळ १९११
मिरज २५०३ 
वाळवा २३०२ 
टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळWaterपाणी