शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

रिक्षा घंटागाडीतून वाचले केवळ पाच लाख- सांगली महापालिकेकडून डोंगर पोखरून उंदीर काढल्याची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 11:57 PM

महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पांतर्गत ४० रिक्षा घंटागाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शासनाच्या जीईएम पोर्टलवरून खरेदीला विरोधही झाला. अखेर जाहीर निविदा काढण्यात आली. आता सर्वात कमी दराची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आली आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीकडे मान्यतेसाठी प्रस्ताव

सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पांतर्गत ४० रिक्षा घंटागाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शासनाच्या जीईएम पोर्टलवरून खरेदीला विरोधही झाला. अखेर जाहीर निविदा काढण्यात आली. आता सर्वात कमी दराची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आली आहे. या निविदेतून महापालिकेला केवळ पाच लाख रुपयांचाच फायदा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून घंटागाडी खरेदीवर काथ्याकुट करून अखेर प्रशासन, नगरसेवकांनी डोंगर पोखरून उंदीर काढल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

स्थायी समितीची सभा गुरुवार, दि. १० रोजी होत आहे. या सभेत ४० रिक्षा घंटागाड्या खरेदीसाठी सर्वात कमी दराची निविदा मंजूर करण्याचा विषय अजेंड्यावर आहे. रिक्षा घंटागाडी खरेदीवरून गेल्या चार महिन्यांपासून महापालिकेच्या वर्तुळात बरीच चर्चा झाली. प्रशासनाने जीईएम या शासनाच्या पोर्टलवरून रिक्षा घंटागाडी खरेदीचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी दोन कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. जीईएम पोर्टलद्वारे प्रक्रिया करण्यास विरोध करुन निविदा प्रक्रिया राबवा, अशी विरोधकांची मागणी होती. स्थानिक डीलरकडून याच रिक्षा घंटागाडीचे कोटेशन मागविले, तर ते सर्व करांसह साडेचार लाखांपर्यंत द्यायला तयार आहेत, असा दावा करत शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी यातील बिंग फोडल्यानंतर सत्ताधारी भाजपने त्यावेळी प्रस्ताव स्थगित ठेवला होता.

त्यानंतर स्थायी समितीने जाहीर निविदा मागवून रिक्षा घंटागाडी खरेदीचा निर्णय घेतला. त्यानुसार जाहीर निविदाही प्रसिद्ध झाली. रिक्षा घंटागाडीसाठी चार निविदा आल्या होत्या. त्यातील सर्वात कमी दराच्या असलेल्या चेतन मोटर्स यांची दोन कोटी ८२ लाख ७३ हजार ४०० रुपयांची निविदा मंजूर करण्याचा विषय स्थायीसमोर आणला आहे. त्यामुळे दोन कोटी ८७ लाखांपेक्षा अवघ्या पाच लाख रुपये कमी किमतीत या रिक्षा खरेदी होणार आहेत. या निविदेनुसार प्रत्येक रिक्षा सात लाखापेक्षा जादा दरानेच खरेदी होण्याची शक्यता आहे. केवळ पाच लाखाच्या जादा खर्चासाठी तब्बल चार महिने हा विषय ताणण्यात आला. केवळ १२ हजार ५०० रुपये प्रत्येक रिक्षामागे कमी झाले आहेत. त्यामुळे आता या विषयावर नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.सीसीटीव्ही निधी वर्ग करण्यास विरोधमहापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही व सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या मागणीवरून पहिल्या टप्प्यात ५० लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यानंतर पुन्हा ५० लाखांचा निधी दिला जाणार आहे. सीसीटीव्ही व सिग्नल यंत्रणेसाठी निविदा मागवाव्यात, पोलीस प्रशासन सांगेल तिथे या दोन्ही यंत्रणा उभारू, पण त्यासाठी निधी वर्ग करण्याची गरजच काय? असा मुद्दा काही स्थायी सदस्यांनी उपस्थित करीत विरोध दर्शविला आहे. तसेच महापालिका क्षेत्रात २० उद्याने विकसित करण्यासाठी जागा निश्चिती, उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी बागमजूर पुरवठा करण्यास वार्षिक एजन्सी नेमण्याचा विषयही समितीसमोर आहे.

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका