शिराळा : दुरंदेवाडी-उंबरवाडी (ता. शिराळा) या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला आहे. या वाड्यांना मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम आम्ही केले आहे. विरोधकांनी येथील जनतेचा निवडणुकीपुरता वापर करून घेतला असून यापुढे त्यांना येथील सूज्ञ जनता थारा देणार नाही, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव नाईक यांनी केे.कुसाईवाडी (ता. शिराळा) येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक व रघुनाथ पाटील, सरपंच धनश्री मुदगे यांची प्रमुख उपस्थिती होती.आ. नाईक म्हणाले, दुरंदेवाडी-उंबरवाडी (ता. शिराळा) ही गावे गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहली आहेत. विशेष करून येथील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण आता कायमस्वरूपी थांबली असल्याने, त्याचे समाधान जास्त आहे.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रणधीर नाईक म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षात आमदार शिवाजीराव नाईक यांनी मतदारसंघात दुर्लक्षित असणाऱ्या गावांचा विकास साधला आहे. विकास कामात आम्हीच अग्रेसर आहे. बिळाशी-भेडसगाव या पुलाच्या उद्घाटनाचा अधिकार विरोधकांना नाही. लवकरच प्रशासकीय पत्रिका काढून या पुलाचे रीतसर उद्घाटन करणार आहोत. यापुढे कुसाईवाडी आणि परिसराचा उर्वरित विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहील.जयवंत मुदगे यांनी स्वागत केले. एकनाथ धस, भगवान मस्के, दीपक पाटील, आनंदा भोगावकर, डॉ. इंद्रजित यमगर, शशिकांत साळुंखे, सुभाष पवार, आनंदा मोंडे, सुरेश पवार, बाजीराव खोत उपस्थित होते. विनोद पन्हाळकर यांनी आभार मानले.' बारमाही पाणीयावेळी आ. शिवाजीराव नाईक म्हणाले की, दुरंदेवाडी-उंबरवाडी ही गावे विकासापासून दुर्लक्षित होती. विरोधकांनी येथील जनतेला फसवले आहे. मात्र आम्ही दिलेल्या अश्वासनाप्रमाणे येथील कामांची पूर्तता केली आहे. बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. रस्त्याचेही काम झाल्याने लवकरच एसटीची सोय देखील उपलब्ध करून देऊ.
विरोधकांकडून केवळ दिशाभूल- शिवाजीराव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:31 PM
शिराळा : दुरंदेवाडी-उंबरवाडी (ता. शिराळा) या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला आहे. या वाड्यांना मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम आम्ही केले आहे.
ठळक मुद्देकुसाईवाडी येथे विकास कामांचे उद्घाटन