शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

सांगली लोकसभेला ७२ वर्षांत केवळ एकदाच महिलेस संधी

By अशोक डोंबाळे | Published: March 30, 2024 4:06 PM

यंदाही संधी नाहीच : २० वा खासदार कोण? मतदार देणार कौल

अशोक डोंबाळेसांगली : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांगली लोकसभेची पहिली निवडणूक १९५२ मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे ७२ वर्षांच्या कालावधीत या मतदारसंघातून १९ खासदार झाले. तर विसावा खासदार आता ठरणार आहे. पण, मागील ७२ वर्षांच्या कालावधीत या मतदारसंघातून महिला उमेदवाराला केवळ १९८० मध्ये एकदाच संधी देण्यात आली. त्यानंतर एकदाही महिला उमेदवाराला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही.जिल्ह्यात २४ लाख १९ हजार मतदारसंख्या असून, यामध्ये ४८ टक्के महिला मतदारांचा समावेश आहे. पण, महिलांना राजकारणात म्हणावे तेवढे प्रतिनिधित्व मिळत नसल्याबद्दल महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात विधानसभेची पहिली निवडणूक १९५२ मध्ये झाली. या पहिल्याच निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातून श्रीमती कळंत्रे (आक्का), तर शिराळा विधानसभा मतदारसंघातून सरोजिनी बाबर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. या निवडणुकीत कळंत्रे आक्का व सरोजिनी बाबर या दोन्ही महिला विजयी झाल्या.त्यानंतर १९८० मध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून शालिनी पाटील यांना काँग्रेसकडून संधी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात नामदेवराव मोहिते निवडणूक मैदानात होते. या निवडणुकीमध्ये शालिनी यांना ४४ हजार ३४१, तर मोहिते यांना १४ हजार ७९९ मते मिळाली होती. शालिनी यांनी विक्रमी २९ हजार ५४२ मताधिक्य घेऊन विजय मिळविला होता. त्यानंतर ३५ वर्षांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर २०१५ मध्ये राष्ट्रवादीकडून सुमनताई पाटील यांना तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून संधी मिळाली.

शालिनी पाटील यांना १९८३ मध्ये लोकसभा निवडणुकीची काँग्रेसकडून संधी मिळाली. या निवडणुकीत त्यांचा विजय होऊन दिल्लीत गेल्या होत्या. पण, त्यानंतर ४१ वर्षांत नारीशक्तीचा जयघोष करणाऱ्या एकाही पक्षाने महिलांना उमेदवारीच दिलेली नाही.राजकारणात महिलांसाठी राखीव जागांमुळे, त्यांच्या सहभागामुळे सर्वसामान्य महिलांचे जीवनमान बदलू लागले आहे. कालपर्यंत शेतात खुरपणारी, चूल आणि मूल सांभाळणारी, खरकटे काढणारी स्त्री पंचायतीत जाऊन गावाचा कारभार पाहू लागली आहे.विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ५० टक्के राहिले, किमान १० टक्के तरी महिलांना संधी देण्याचे धाडस राजकीय पक्षांनी दाखविण्याची गरज होती. पण, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांनी सांगली जिल्ह्यातील महिलांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राजकारणापासून दूरच ठेवले आहे.महिलांची संख्या निर्णायकजिल्ह्यातील २४ लाख १९ हजार मतदारांपैकी १२ लाख ३० हजार ३२६ पुुरुष आणि ११ लाख ७८ हजार ६३७ महिला मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या निर्णायक असतानाही त्यांना लोकसभेला संधी दिली जात नाही, याबद्दल महिला संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणWomenमहिला