सांगली : गेली दहा वर्षे शिक्षक बँकेत पुरोगामी सेवा मंडळाचा कारभार हा पारदर्शी व काटकसरीचा आहे. निवडणुकीत परिवर्तनाची भाषा करणाऱ्यांना शिक्षक संघ थोरात गटास सभासदच कायमचे घरी बसवतील, असा टोला शिक्षक समितीचे जिल्हा नेते किसन पाटील यांनी लगावला.
पाटील म्हणाले की, समितीने बँकेमध्ये सभासद हिताचा कारभार केला आहे. गेली पाच वर्षे कर्जाचे व्याजदर कमी केले. लाभांशात प्रत्येक वर्षी वाढ केली आहे. संगणक खरेदी, दुरुस्ती, स्टेशनरी या योग्य प्रमाणात खरेदी केल्या आहेत. विरोधी संचालक हे केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आरोप करीत आहेत. त्यांच्या पोकळ वल्गनामुळेच बँकेच्या आगामी निवडणुकीत पुरोगामी सेवा मंडळ व शिक्षक समितीला वाढता पाठिंबा मिळत आहे. बँकेचे सभासदच शिक्षक संघ थोरात गटाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. विरोधक परिवर्तन रॅलीची घोषणा करत आहेत. किती ही रॅली काढली तरी परिवर्तन होणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, राज्य कार्याध्यक्ष किरण गायकवाड, पुरोगामी मंडळाचे सचिव शशिकांत भागवत, राज्य संघटक सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, दयानंद मोरे, माणिकराव पाटील, सतीश पाटील, बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव, उपाध्यक्ष महादेव माळी, तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, यू. टी. जाधव, शिवाजीराव पवार, श्रेणिक चौगुले, राजाराम सावंत, अर्चना कोळेकर, बाळासोा अडके, सदाशिव पाटील, रमेश पाटील, हरिभाऊ गावडे, श्रीकांत माळी उपस्थित होते.