शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

सांगलीत पाच ठिकाणी होणार ‘ओपन जिम’

By admin | Published: April 25, 2016 11:29 PM

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक : महापालिकेला मिळणार जिल्हा नियोजन समितीतून निधी

सांगली : मुंबईसह इतर मोठ्या शहरात राबविलेली ओपन जिमची संकल्पना आता सांगली शहरात अस्तित्वात येणार आहे. शहरात पाच ठिकाणी ओपन जिमची सूचना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केली आहे. त्याला महापालिकेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच जागांची निश्चिती करून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाईल. या ओपन जिमसाठी जिल्हा नियोजन समितीतून ५० लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासमवेत सोमवारी दुपारी महापौर हारुण शिकलगार, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी गायकवाड यांनी ओपन जिमची संकल्पना मांडली. मुंबईसह राज्यातील इतर मोठ्या शहरातील उद्यानात ओपन जिमची संकल्पना मूळ धरू लागली आहे. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक असल्याने हा उपक्रम हाती घेण्यास महापौर शिकलगार व सभापती संतोष पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरातील आमराई व महावीर उद्यानात ओपन जिम करण्यावर बैठकीत चर्चा झाली. एकूण पाच ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च येईल. हा निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्याची तयारीही जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सकारात्मक उपक्रमाला साद देत महापालिकेने जागा निश्चितीचे काम हाती घेतले आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक गावे टंचाईचा सामना करीत आहेत. शहरात नागरिकांनाही चार दिवसांपूर्वी पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर शहरातील विहिरीचे पुनरुज्जीवन करून पाण्याचा स्रोत जिवंत ठेवण्याची संकल्पनाही जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली. महापालिकेच्या मालकीच्या विहिरीतील पाण्याचा दैनंदिन वापर व्हावा, अशीच गायकवाड यांची अपेक्षा आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून मदतीचा हात पुढे केला आहे. किमान पाच विहिरीवर सौरऊर्जेवर चालणारे सबमर्सिबल पंप बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शविल्याचे सभापती संतोष पाटील यांनी सांगितले. महापलिकेच्या अंदाजपत्रकात सभापती पाटील यांनी सांगली व कुपवाड या दोन ठिकाणी गॅस दाहिनी बसविण्याची घोषणा केली होती. या दोन्ही गॅस दाहिनीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी दिला जाणार आहे. याशिवाय सांगली बायपास रस्त्यावरील स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर गॅस दाहिनीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी बैठकीत केली आहे. (प्रतिनिधी)दहा कोटींचा : प्रस्ताव देणारमहापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची मागणी सभापती पाटील यांनी बैठकीत केली. महापालिकेला २० कोटींचा निधी देण्याचा आग्रहही त्यांनी धरला. पण जिल्हा नियोजन समितीतून किमान दहा कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत. सर्व नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचा समावेश असलेला प्रस्ताव तयार करून त्याला महासभेची मान्यता घेऊन दहा कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.