इस्लामपूर : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर यांच्यावतीने जायंट्स ओपन जिम हा प्रकल्प पूर्णपणे अभिनव व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे यांनी केले.
या ओपन जिमच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उद्योजक सर्जेराव यादव, अशोक शिंदे, जायंट्सचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने, उद्योजक दिलीप राजमाने, अॅड. किरण पाटील, उद्योजक गौतम रायगांधी, सतीश सूर्यवंशी, उदय पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
साडेचार लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे उद्घाटन थोड्या दिवसात होणार असून, या प्रकल्पामुळे इस्लामपूर शहराच्या वैभवात मोलाची भर पडेल. यावेळी कार्यवाह रणजित जाधव, खजिनदार अॅड. श्रीकांत पाटील, फेडरेशन माजी अध्यक्ष माधुरी चौगुले व सदस्य प्रशांत माळी, राजकुमार ओसवाल, डॉ. सदानंद जोशी, भूषण शहा, नितीन शहा, नितीन पारेख, गजानन परब, दत्तात्रय माने, गणेश पाटील, अभय शहा, किरीट पटेल, अनिल पाटील, अर्जुन पाटील, राकेश कोठारी, महेश ओसवाल, रवी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
फोटो
०२१२२०२०-आयएसएलएम- इस्लामपूर जायंटस्
ओळ : इस्लामपूर येथील पोलीस परेड ग्राऊंडवर ओपन जिमचे भूमिपूजन गिरीश चितळे, नारायण देशमुख, दिलीप राजमाने, दुष्यंत राजमाने, रवी सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झाले.