शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

मदनभाऊंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

By admin | Published: November 15, 2015 1:06 AM

बांधकाम विभागाची मंजुरी : महापालिकेला दिलासा, लवकरच काम सुरू होणार

सांगली : महापालिकेच्यावतीने माधवनगर रस्त्यावरील त्रिकोणी भूखंडावर मदनभाऊ पाटील यांचा पुतळा व उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण हा भूखंड राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला हरकत घेतली होती. अखेर काही अटींवर पुतळा व उद्यान उभारण्यास बांधकाम विभागाने मान्यता दिल्याने, मदनभाऊंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्कालीन सांगली नगरपालिका व आताच्या महापालिकेवर गेली ३५ वर्षे एकहाती सत्ता गाजविणाऱ्या मदन पाटील यांचे आॅक्टोबर महिन्यात निधन झाले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी मदनभाऊंचे स्मारक, पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. तसा ठरावही २ नोव्हेंबरच्या महासभेत करण्यात आला आहे. वसंतदादा स्फूर्तिस्थळावर समाधी व माधवनगर रस्त्यावरील त्रिकोणी भूखंडावर पुतळा व उद्यान उभारण्यात येणार आहे. मदनभाऊंच्या पुतळ्याचे काम मिरजेतील प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याचदरम्यान त्रिकोणी भूखंडावर पुतळा उभारण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने आक्षेप घेतला होता. पण ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बांधकाम विभागाने नरमाईचे धोरण घेतले. माधवनगर रस्त्यावरील हा भूखंड मालेगाव, विटा, तासगाव-सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वर आहे. या रस्त्याची हद्द ३०.४८ मीटर इतकी आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने काही अटी घालून महापालिकेला पुतळा व उद्यान उभारण्यास परवानगी दिली आहे. यात रस्त्याच्या मध्यापासून २१.२४ मीटर अंतर सोडून पथकिनारवर्ती नियमांचे पालन करण्याचे बंधनही महापालिकेवर घालण्यात आले आहे. तसेच पुतळा व उद्यानात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रीय मार्गाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. दक्षिण बाजूकडील जुन्या रस्त्यावरून प्रवेश करण्याची व वाहन पार्किंगची व्यवस्था स्वत:च्या जागेत करण्याची अटही बांधकाम विभागाने घातली आहे. अडथळे दूर झाल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी) २ डिसेंबरला उदघाटन मदनभाऊ पाटील यांची २ डिसेंबर रोजी जयंती आहे. यादिवशी महापालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन व उद्यानाच्या कामाच्या प्रारंभासह समाधीचे लोकार्पण केले जाणार आहे. कुपवाड येथील प्रभाग कार्यालयाचे कामही वेगाने सुरू आहे. तेथील सभागृहाला मदनभाऊंचे नाव दिले जाणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावरील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.