सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री जिल्'ात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ ही मोहीम राबवून गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. विविध प्रकारच्या अडीचशे कारवाया करण्यात आल्या. यातून ४६ हजाराचा दंड वसूल केला.जिल्हा पोलीसप्रमुख सुहेश शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सांगली, मिरजेसह जिल्'ात रात्री आठ ते अकरा या वेळेत २८ ठिकाणी नाकाबंदीचे ‘पॉर्इंट’ लावण्यात आले होते. यामध्ये ४१ अधिकारी, ३०७ कर्मचारी सहभागी झाले होते. प्रत्येक वाहन थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. दुचाकीस्वारांकडे कागदपत्रांची तपासणी केली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. न्यायालयाच्या ‘वॉरंट’मध्ये फरार असलेल्या तीन गुन्हेगारांना पकडण्यात आले. दारूची वाहतूक करणाºया एकास रंगेहात पकडले. रात्री उशिरापर्यंत हॉटेल, ढाबे व पान दुकाने सुरु ठेवणाºया ११ व्यावसायिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेले विविध गुन्'ांतील नऊ संशयितही सापडले. रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार सापडल्याने त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सेफ्टी बेल्ट न वापरणे, कर्कश्श हॉर्न, विनाहेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट व फॅन्सी नंबर प्लेट, तसेच बेकायदा प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवरही कारवाई करण्यात आली. विविध प्रकारच्या सुमारे अडीचशे कारवाया करण्यात आल्या. यातून ४६ हजाराचा दंड वसूल केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेश शर्मा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी या कारवाईचा आढावा घेतला.
तळीरामांना दणकापोलिसांनी अचानक कारवाई सुरु केल्याने दारूच्या नशेत वाहन चालविणाºया तळीरामांची पळापळ झाली. गल्ली-बोळांचा आधार घेत त्यांनी वाट काढण्याचा प्रयत्न केला. तरीही ५२ तळीराम या कारवाईत सापडले. त्यांची वाहने जप्त केली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल केले आहेत.