भाटवाडी येथे शेतकरी सभासद संपर्क बैठकीत अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले यांनी मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : निवडणुका जवळ आल्या की खोटे आरोप करण्यात विरोधक पटाईत आहेत. संचालक मंडळाच्या सभेत न बोलणारे विरोधक, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सभासदांची दिशाभूल करत आहेत. मुळात विरोधकांना सत्ता नेमकी कशासाठी हवी आहे हे, त्यांनी एकदा सभासदांना सांगावे, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
शेणे, भाटवाडी (ता. वाळवा) येथे शेतकरी सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते. संचालक लिंबाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, गिरीश पाटील, दिलीपराव पाटील, संजय पाटील, सुजीत मोरे, मनोज पाटील, सरपंच विनायक निकम, हरिश्चंद्र औताडे, उपसरपंच अमोल देवकर, किरण उथळे, काशिलिंग तिवले, शिवाजी उथळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की सभासदांचे हित डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही कारखान्यात कारभार करत आहोत. वास्तविक कारखान्यात स्थिरता असेल, तर कारखाना उत्कृष्टपणे चालतो. आम्ही कारखान्यात प्रगती करत पुढे चाललो आहे. कारखाना साखर निर्मितीबरोबरच इथेनॉल निर्मिती करत आहे. कृष्णा कारखाना चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये, याची काळजी आपण सर्व सभासदांनी घेण्याची गरज आहे.
याावेळी व्ही.पी. पाटील, दत्तात्रय पाटील, दीपक पाटील, भीमराव पाटील, रामभाऊ पाटील, रघुनाथ पाटील, नाथजी पाटील, हरिश्चंद्र औताडे, शिवाजी उथळे, सुरेश जाधव, किरण उथळे, उपसरपंच अमोल देवकर उपस्थित होते.