शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

नागपूजेबाबत निवडणुकीनंतर आदेश

By admin | Published: January 29, 2017 11:09 PM

रावसाहेब दानवे : सागाव येथे उदयसिंह नाईक गटाचा भाजपमध्ये प्रवेश

मांगले : शिराळ्याची जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा आचारसंहिता संपताच अध्यादेश काढून पुन्हा सुरु करण्यात येईल, असे आश्वासन देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले.सागाव (ता. शिराळा) येथे पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती उदयसिंह नाईक, शोभाताई नाईक, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, जिल्हा परिषद सदस्या वैशाली नाईक, अ‍ॅड. करणसिंह चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दानवे म्हणाले, भाजप सरकारने पीकविम्याची पध्दत बदलली. खतांच्या किमती पाच वर्षे स्थिर ठेवल्या. दारिद्र्यरेषेतील कुटुंबांना केवळ शंभर रुपयात गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली आहे. याचा लाभ जनता घेत आहे. राज्यात जलयुक्त शिवार योजना राबवून शेकडो गावे दुष्काळमुक्त केली आहेत. भाजप सरकारने ६८ वर्षे शेतकऱ्यांनी सहन केलेली अन्यायी आणेवारी पध्दत आम्ही एका वर्षात बदलून, ३३ टक्के आणेवारी असणारी गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची योजना आणली. शेतकऱ्यांना दीडपट जादा मदत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही कागदावरचे नाही, तर जातीवंत शेतकरी आहोत.शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यात वैचारिक क्रांती झाली असून, सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. आगामी सर्व निवडणुकांत भाजपचीच सत्ता येईल. यावेळी रणजितसिंह नाईक, शोभाताई नाईक यांनी विश्वासराव नाईक यांनी स्थापन केलेल्या साखर कारखान्याच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, नानासाहेब महाडिक, जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, नीता केळकर, गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, निशिकांत पाटील, विक्रम पाटील, प्रल्हाद पाटील, अतुल भोसले, रवी अनासपुरे, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर उपस्थित होते. (वार्ताहर)खुर्ची आणि संजयकाका...आमदार शिवाजीराव नाईक यांचे भाषण सुरु असताना खासदार संजय पाटील यांचे आगमन झाले. त्यावेळी त्यांना बसायला खुर्ची नव्हती. संयोजकांनी खुर्ची आणून दिली. ती मध्येच काढून घेत संजयकाका मंत्रीमहोदयांकडे निघाले. त्यावेळी चंद्रकांतदादा व दानवेंनी, ‘खुर्ची ठेवा, इकडे या, इथे शिवाजीरावांची खुर्ची आहे’, असे सांगितले. त्यावेळी ‘नको, खुर्चीच घेऊन येतो’ असे संजयकाका म्हणाले. हे ऐकून शिवाजीराव नाईक यांनी ध्वनिक्षेपकावरूनच, ‘खासदारसाहेब, खुर्ची सोडायची नाही’ अशी जाहीर टिपणी केल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. मासे आणि भाजपचे खतरनाक जाळे सांगली जिल्ह्यात भाजपचा कार्यकर्ता दुर्बिणीतूनसुध्दा सापडत नव्हता, मात्र एक खासदार व चार आमदार गेल्यावेळेस आमच्या फासक्यात सापडले. आमच्या नजरेत भरला तर तो भाजपमध्ये आलाच म्हणून समजा. याचे श्रेय चंद्रकांतदादांना जाते. भाजपचे जाळे खतरनाक असून, त्यामध्ये अनेक मासे आत्तापर्यंत सापडले आहेत, अशी मिश्किलीही रावसाहेब दानवे यांनी केली.