हद्दपार करण्यात आलेल्यांपैकी जय ऊर्फ शीतल शंकर नेमाडे (मंगळवार पेठ, परीट गल्ली, मिरज), सूरज रमेश काळे (यल्लम्मा मंदिर जवळ, कुपवाड) व रवींद्र रमेश रामगडे (हनुमाननगर, एमआयडीसी, कुपवाड) या तिघांना एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
अभिजित उर्फ सोन्या बापूसाहेब पाटील (स्फूर्ती चौक, विश्रामबाग, सांगली), अरबाज ऊर्फ मोहसीन महंमद शेख (ख्वॉजा वस्ती, मिरज), दस्तगीर आब्बास निशाणदार (इदगाहनगर, मिरज) या तिघांना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून एक वर्षासाठी व ख्वॉजा कलंदर शेख (इदगाहनगर, मिरज) यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून दीड वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
वरील सर्वांविरुद्ध मिरज शहर, महात्मा गांधी चौक, एमआयडीसी, विश्रामबाग पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी संबंधित सातजणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, मारामारी असे एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी तिघांना सांगली जिल्ह्यातून व चौघांना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे.