डागडुजी सुरू असल्याने त्यावरून वाहतूक बंद आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेवर, तसेच व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे मंजूर असलेल्या
पर्यायी समांतर पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आ. सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे
केली आहे.
आ. गाडगीळ यांनी याबाबत निवेदन दिले. यावेळी महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते विनायक सिंहासने, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक गजानन मगदूम उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, आयर्विन पुलास शंभर वर्षे झाली आहेत. हा पूल शहराच्या दैनंदिन दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे काही भागांतील पूल वाहून जाण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे आ. गाडगीळ यांनी आयर्विन पुलाला समांतर पर्यायी पूल बांधण्यास तत्कालीन राज्य शासनाची मंजुरी मिळविली. त्यानुसार पुलाचा आराखडा, अंदाजपत्रक तयार केले आहे; परंतु आजअखेर या पुलाचे काम सुरू झालेले नाही.
सध्या आयर्विन पूल दुरुस्तीसाठी वाहतुकीस बंद ठेवला आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सांगलीतील बाजारपेठ व व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत आणणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. व्यापारी, शेतकरी यांच्यासह सांगलीत येणाऱ्या नागरिकांचीही अडचण झाली आहे. पर्यायी पूल बांधल्यास त्याचा नागरिकांसह सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. त्यामुळे मंजूर पर्यायी पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.